परळी

​खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे हल्लाबोल मोर्चा !​ ​​मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - धर्माधिकारी​​

परळी वै.दि. 2/प्रतिनिधी....
नाकर्त्या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल यात्रा सुरु केली. हल्लाबोल यात्रेचा दुसऱ्या टप्पामराठावाड्यातील सर्व जिल्ह्यात नुकताच संपन्न झाला. याचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरदचंद्र पवार  यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होत आले.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

​महाशिवरात्रीनिमित्त परळीत होणार शिव पुराण ज्ञान महायज्ञ​ ​धार्मिक कार्यक्रमांसोबत विधायक सामाजिक उपक्रमांचेदेखील खाटुवालापरिवारातर्फे आयोजन​

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाशिवरात्रीनिमित्त दि. ८ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१८दरम्यान शिव पुराण ज्ञान महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील हालगेगार्डनमध्ये सलग ९ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात परमपुज्य श्री गिरी बापूजीमहाराज शिव कथेचे विवेचन करणार आहेत. विशेष म्हणजे या शिवकथेसाठी गुजरातमधूनदोन हजारपेक्षा अधिक भाविक भक्त परळीत येणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत २ फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमाचे संयोजक जामनगर येथीलखाटुवाला परिवाराने सविस्तर माहिती दिली.

मूकनायक दिवस परळी पत्रकार संघाच्यावतीने साजरा

परळी (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मुंबईतून मूकनायक वृत्तपत्र  सुरू केले आणि देशात नव्या क्रांतीस सुरूवात झाली. तसेच शोषित वंचितांचा आवाज मूकनायक वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी लेखणीच्या माध्यमातुन जगापुढे आणला असे प्रतिपादन पत्रकार संघाचे शहराध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी केले. ते परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मूकनायक दिन कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत होते. 

परळी धर्मापुरी रोडवर गतिरोधक बसवा - मोहन साखरे

परळी वै.प्रतिनिधी
परळी धर्मापुरी रोडवर सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे मागिल चार दिवसांत दोन अपघातात दोघांना आपला जिव गमवावा लागला आहेत. या रोडवर सध्या कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. भरधाव वेगाने धावनार्या वाहनामुळेच अपघात होत असल्याने परळी धर्मापुरी रोडवर ठिक ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रा.पं.सदस्य मोहन साखरे यांनी केली आहे.

परळीत विजेच्या खांबाला गळफास घेऊन वृद्धाची अात्महत्या

परळी (प्रतिनीधी) शहरातील वडसाविञी भागात अाज दुपारी थर्मल परिसरातील एका ६५ वर्षीय वृद्धाने विजेच्या खांबाला गळफास घेउन अात्महत्या केल्याची घटना घडली असुन परळी पोलीस घटनास्थळी दाखल झाली अाहे माञ अात्महत्येचे कारण अज्ञाप स्पष्ट झालेले नाही
परळी येथील वडसाविञी भागात अाज दुपारी पंढरी रघूनाथ बने वय ६५ याने त्या भागातील एका विजेच्या खांबाला दोरीच्या साहय्याने गळफास घेउन अात्महत्या केली परळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन दुपारी उशीरा पर्यत पंचनामा सुरु होता

मोटार सायकल अपघात एक ठार

परळी - परळी तालुक्यातील धर्मापुरी रोडवरील सिमेंट फॅक्टरीजवळ अाज राञी ९ च्या सुमारात अज्ञात वाहनाने मोटार सायकला जोराची धडक दिली या अपघातात परळी येथील गणेशपार येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली
परळी येथील गणेशपार भागातील तुकाराम झिरपे हे मोटार सायकल वरुन परळी येत असताना धर्मापुरी रोडवर अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या अपघातामध्ये झिरपे हे जागीच ठार झाले

सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव रुग्णांची सेवा वाऱ्यावर .!

सिरसाळा(प्रतिनिधी)तालुक्यातील सर्वात मोठे बाजार पेठ व32खेड्याचा नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणारे आरोग्य केंद्र म्हणजे सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र होय याठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैर सोय होताना दिसत आहे

आज पासून नवीन माणसांशी मला जोडलंय आणि मी एकदा जुडल्या नंतर जोडणारांना आयुष्यात कधीच विसरत नाही - पंकजाताई मुंडे

परळी- मेहबुबिया शिक्षण संस्था व परळी क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचे अध्यक्ष सय्यद करीम सय्यद यासीम यांना 100  वर्ष पूर्ण झाल्याबद्दल क्रीडा महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे.

माझी कन्या भाग्यश्री लघुचित्रपट देशाला मुलींची जनजागृती देणारा संदेश ठरेल- डॉ.शालिनीताई कराड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दिग्दर्शक राहुल केंद्रे,सहदिग्दर्शक अनुज पालसिंगनकर व लेखक संतोष क्षिरसागर यांनी माझी कन्या भाग्यश्री हा लघुचित्रपट संपूर्ण देशाला स्त्रीभ्रूण हत्या विरोधी जनजागृती करणारा ठरेल असे प्रतिपादन महिला व बाल हक्क आयोगाच्या सदस्या डॉ.शालिनीताई कराड यांनी केले त्या या लघुचित्रपट पोस्टर लाँच करताना बोलत होत्या.

Pages