लाइव न्यूज़
वाहन चालक संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू - ना. पंकजाताई मुंडे; जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
परळी वैजनाथ दि. 27...
वाहन चालक संघटनेच्या मागण्या अगदी रास्त आहेत, या मागण्यांबाबत आपण सकारात्मक विचार करून न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही ग्राम विकास, महिला व बालकल्याण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज शहरातील वाहन चालकांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी ना. पंकजाताई यांनी वाहन चालकांशी हितगुज करून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने आज ना. पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अपघातावेळी चालकास मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल करावा, वाहनचालकांचा असंघटित कामगारामध्ये समावेश करून विविध योजनांचा लाभ मिळावा, भिमा कोरेगाव प्रकरणात नुकसान झालेल्या वाहनांची नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने सादर केले. यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्व वाहन चालकांशी हितगुज करून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.
वाहन चालकांच्या मागण्याबाबत मी सकारात्मक विचार करून तुम्हाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ना. पंकजाताई यांची सकारात्मक भूमिका पाहून वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे. शिष्टमंडळात रमेश गिते, भानुदास फड, प्रकाश मुंडे, सुधाकर कराड, केशव बहिरे, बालाजी तारसे आदींसह अनेक वाहन चालकांचा समावेश होता.

Add new comment