​महाशिवरात्रीनिमित्त परळीत होणार शिव पुराण ज्ञान महायज्ञ​ ​धार्मिक कार्यक्रमांसोबत विधायक सामाजिक उपक्रमांचेदेखील खाटुवालापरिवारातर्फे आयोजन​

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाशिवरात्रीनिमित्त दि. ८ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१८दरम्यान शिव पुराण ज्ञान महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील हालगेगार्डनमध्ये सलग ९ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात परमपुज्य श्री गिरी बापूजीमहाराज शिव कथेचे विवेचन करणार आहेत. विशेष म्हणजे या शिवकथेसाठी गुजरातमधूनदोन हजारपेक्षा अधिक भाविक भक्त परळीत येणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत २ फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमाचे संयोजक जामनगर येथीलखाटुवाला परिवाराने सविस्तर माहिती दिली.
यापूर्वी काशी विश्वनाथ, श्रीशैल मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर येथे हा महायज्ञ सोहळापार पडला आहे. यावर्षी परळी वैजनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगअसणाऱ्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परमपुज्य श्री गिरी बापूजी महाराज आपल्यासुश्राव्य वाणीतून शिवकथा सांगणार आहेत. दररोज सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान गायत्रीयज्ञ संपन्न होईल. तर शिवकथा दररोज दुपारी ३ ते संध्याकाळी साडे सहा दरम्यान कथनकेली जाईल. या कार्यक्रमात कथा महात्म्य, शिव प्रागट्य, शिवलिंग महत्त्व, ओम नमः शिवायमहामंत्र महत्त्व, रुद्राक्ष महत्व, बेलपत्र महत्व, सती प्रागट्य महत्व, शिव पार्वती विवाह,कार्तिकेय प्रागट्य, गणेश प्रागट्य, बारा ज्योतिर्लिंगाच्या कथा, पार्थिव लिंग पूजा, शिवपुराणमधील अनेक प्रसंग आदी गोष्टींचे विवेचन श्री गिरी बापूजी महाराज करणार आहेत.कार्यक्रमात दररोज अन्नदानदेखील होणार आहे. शिवकथेची सांगता १६ फेब्रुवारी रोजीहोईल. शिवकथेचे थेट प्रसारण दररोज आस्था वाहिनी, पीसीएन न्यूजवरूनदेखील केलेजाणार आहे. या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन खाटुवालापरिवारातर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत २ फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमाचेसंयोजक जामनगर येथील खाटुवाला परिवाराने सविस्तर माहिती दिली. यावेळी शहरातील पत्रकार तथा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
​धार्मिक कार्यक्रमांसोबत विधायक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन​

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या या धार्मिक कार्यक्रमात विधायक सामाजिकउपक्रमदेखील आयोजित केले आहेत. या उपक्रमा अंतर्गत ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान लोकआरोग्य केंद्र मुंबई यांच्या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीरहोणार आहे. या शिबिरात गरजू रुग्णांना मोफत औषधी व चष्मे दिले जाणार आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.