परळी धर्मापुरी रोडवर गतिरोधक बसवा - मोहन साखरे

परळी वै.प्रतिनिधी
परळी धर्मापुरी रोडवर सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे मागिल चार दिवसांत दोन अपघातात दोघांना आपला जिव गमवावा लागला आहेत. या रोडवर सध्या कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. भरधाव वेगाने धावनार्या वाहनामुळेच अपघात होत असल्याने परळी धर्मापुरी रोडवर ठिक ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रा.पं.सदस्य मोहन साखरे यांनी केली आहे.

तालुक्यातील परळी धर्मापुरी रोड मागिल काही दिवसापुर्वा मांडवा फाट्यावर मोटार सायकल अपघात दोघांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच .या रोडवर मागिल चार दिवसात दोन वेगवेगळ्या आपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या रोडवर सध्या गतिरोधक नाहीत परिणामी वाहने वेगाने धावत असतात लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोडवर गतिरोधक बसवन्याची मागणी जोर धरत आहे.

सदरील रोडवर वैजवाडी फाटा , कासारवाडी व मिरवट फाटा, मांडवा फाटा , नंदनज , सारडगाव फाटा, आदी गावातील फाट्यावर लवकरात लवकर गतिरोध बसवन्याची अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रा.पं.सदस्य मोहन साखरे दिला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.