परळी

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीची ना. पंकजाताई मुंडेंनी केली पाहणी

परळी दि. ०३ ----- पावणे पांच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाला राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

लोकांपर्यंत आता खरा विकास पोहोचतोय - ना. पंकजाताई मुंडे

गांव तिथे विकास दौ-यात जागच्या जागी प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थ आनंदले
——————————————————————————————
परळी

परळी मतदारसंघ विकासाने आणि चागल्या विचाराने सजवणार- ना.पंकजाताई मुंडे

बीड- (प्रतिनिधी) आई वडील आपल्या मुलाला चागले विचार,संस्कार देऊन मोठे करतात. मोठा झाल्यावर तो आई वडिलांना सांभाळतो हा परळी मतदारसंघ माझी आई आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी या पदावर आहे  त्यामुळे या माझ्या परळीचा विकास करण्यासाठी मी मुलगी या नात्याने नुसती साडी नाही तर पैठणी घेऊन आले आहे.

परळीत गोडाऊनवर छापा; दोन टन लोखंड जप्त

परळी, (प्रतिनिधी):- शहरातील बरकतनगर भागातील एका गोडाऊनवर पोलिसांच्या टिमने छापा टाकून दोन टन लोखंड जप्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामध्ये थर्मलसह अन्य कंपन्यातील लोखंडाचा समावेश असण्याचा अंदाज व्यक्त केला जात असुन दुपारी उशिरापर्यंत कारवाई सुरु होती. स्वत: पोलिस उपअधिक्षक विशाल आनंद, पोनि.उमेश कस्तुरे कारवाईत सहभागी असल्याचे समजते.

ना.पंकजाताईंचा गाव तिथे विकास! परळीतील खोडवा सावरगाव येथून झाला दौर्‍याला प्रारंभ

परळी, (प्रतिनिधी):- राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या गाव तिथे विकास दौर्‍याला खोडवा सावरगाव (ता.परळी) येथून आज सुरुवात झाली आहे. दौर्‍या दरम्यान ठिकठिकाणी ना.पंकजाताईंचे स्वागत करण्यात आले. दुपारी उशिरापर्यंत त्यांचा विकास दौरा गावा-गावात दाखल होत होता.

वैद्यनाथ कारखाना परिसरात आग

परळी, (प्रतिनिधी):- येथून जवळच असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ कारखाना परिसरात रात्री उशिरा अचानक आग लागली. या आगीमुळे काही वेळ तांत्रिक प्रक्रिया ठप्प झाली होती. सदरील आग कशामुळे लागली याची माहिती मात्र समोर आली नाही.

सोनहिवर्‍यात हिंस्त्र प्राणी

परळी, (प्रतिनिधी):- तालुक्यातील सोनहिवरा येथील डोंगर परिसरात आज सकाळी हिंस्त्र प्राणी आढळून आला. ग्रामस्थांनी तहसिलदारांना माहिती दिल्यानंतर दुपारी उशिरा वन विभागाचे अधिकारी सोनहिवर्‍याकडे रवाना झाले आहेत. सदरील हिंस्त्र प्राण्याच्या वावरामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

तडीपार गुंडाकडून बाजारपेठेत धुडगूस परळीत व्यापार्‍यांची तक्रार; शहर आणि संभाजीनगर पोलिसांचे एकमेकांकडे बोट

परळी, (प्रतिनिधी):- एका तडीपार गुंडाने बाजारपेठेत धुडगूस घालून व्यापार्‍यांना त्रास देण्याचे प्रकार सुरु केले आहेत. आज सकाळीही सदरील गुंडाने काही ठिकाणी गोंधळ घातल्याने संतापलेल्या व्यापार्‍यांनी पोलिसांना निवेदन देवून दखल घेण्याची मागणी केली. सदरील गुंड तडीपार असुनही पोलिस कसलीच कार्यवाही करत नाहीत.उलट शहर पोलिस ठाणे आणि संभाजीनगर ठाण्याचे पोलिस एकमेकांकडे बोट दाखवत व्यापार्‍यांना मानसिक त्रास देवून लागले आहेत.

परळी पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ महिलेची न्यायालयात धाव; पोलिस निरिक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी

परळी, (प्रतिनिधी):- जमीन वाटणीच्या कारणावरुन एका प्रकरणात तक्रार देवूनही गुन्हा दाखल करण्यास परळी ग्रामीण पोलिसांनी टाळाटाळ केली आहे. या प्रकरणी सदरील महिलेने आज न्यायालयात धाव घेत न्यायालयाच्या गाईड लाईन दुर्लक्षित करुन गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार देणार्‍या पोलिस निरिक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

‘आज ढोल बडवले उद्या अधिकारी बडवू’, कर्जमाफी यादीसाठी शिवसेनेचे आंदोलन

परळी । प्रतिनिधी
फडणवीस सरकार द्वारे घोषित करण्यात आलेल्या कर्जमाफीत लाभर्ती ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा आज ढोल बडवले आणि शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड जर थांबली नाही तर अधिकारी बडवणार असल्याचा इशारा शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बोलताना शेतकर्यांच्या हितासाठी पालकमंत्री, विरोधी पक्षनेते दोघेही मूग गिळून गप्प का असा संतप्त सवाल करून शेतकऱ्यांशी होत असलेले व्यवहार बँकेने मराठीतच करावे अशी मागणी त्यांनी केली.

Pages