लाइव न्यूज़
परळी पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ महिलेची न्यायालयात धाव; पोलिस निरिक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी
Beed Citizen | Updated: March 21, 2018 - 3:38pm
परळी, (प्रतिनिधी):- जमीन वाटणीच्या कारणावरुन एका प्रकरणात तक्रार देवूनही गुन्हा दाखल करण्यास परळी ग्रामीण पोलिसांनी टाळाटाळ केली आहे. या प्रकरणी सदरील महिलेने आज न्यायालयात धाव घेत न्यायालयाच्या गाईड लाईन दुर्लक्षित करुन गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार देणार्या पोलिस निरिक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
परळी येथील जिरेवाडी परिसरातील आशा श्रीकृष्ण मुंडे यांनी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात जमीन वाटणीच्या प्रकरणाची तक्रार केली होती. सदरील पोलिस निरिक्षकांनी गुन्हा नोंद करुन घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन क्र.६८/२०१८ अन्वये फिर्याद नोंद करुन घेणे अनिवार्य असतांनाही पोलिस निरिक्षकाने गुन्हा दाखल करुन घेतला नाही. राजकीय दबाव व आर्थिक देवाण-घेवाणमुळे त्यांनी गुन्हा नोंद करण्यास स्पष्ट नकार देत १६६ भादंवीप्रमाणे कारवाई केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सदरील महिलेने न्यायालयात अर्ज दाखल करुन परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.
Add new comment