लाइव न्यूज़
परळीत गोडाऊनवर छापा; दोन टन लोखंड जप्त
Beed Citizen | Updated: April 2, 2018 - 3:17pm
परळी, (प्रतिनिधी):- शहरातील बरकतनगर भागातील एका गोडाऊनवर पोलिसांच्या टिमने छापा टाकून दोन टन लोखंड जप्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामध्ये थर्मलसह अन्य कंपन्यातील लोखंडाचा समावेश असण्याचा अंदाज व्यक्त केला जात असुन दुपारी उशिरापर्यंत कारवाई सुरु होती. स्वत: पोलिस उपअधिक्षक विशाल आनंद, पोनि.उमेश कस्तुरे कारवाईत सहभागी असल्याचे समजते.
परळी येथील बरकत नगर भागात भंगार व्यापार्याचे मोठे गोडावून आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस उपअधिक्षक विशाल आनंद, पोनि.उमेश कस्तुरे यांच्या टिमने गोडावूनवर छापा टाकला. सदरील कारवाईमध्ये सार्वजनिक ठिकाणी व्रिकी न करता येणार्या लोखंडाचा साठा आढळला आहे. साधारण: ३० ते ३५ लाख रुपयांचे दोन टन लोखंड जप्त करण्याची कारवाई दुपारी उशिरापर्यंत सुरु होती.
Add new comment