बनावट कागदपत्रा आधारे कर्ज घेतलेल्या कर्जदारांवर कधी गुन्हे दाखल करणार ? - पवार
परळी प्रतीनिधी:- वैद्यनाथ बैंकेचे चेअरमन यांच्या शिफारशीवरुन कर्जदारांनी बनावट कागदपत्रा आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले आहे त्यामुळे बैंक डबघाईला येऊन गोरगरिबांच्या ठेवीला धोका निर्माण होत आहे मा चेअरमन यांनी स्वतः च्या मर्जीतील व स्वतः च्या फायद्यासाठी कर्जदाराचे घनिष्ठ संबंध असल्याने कोणतेही तारण न घेता कर्ज दिले आहे परंतु लहान कर्जदार व शेतकरी यांना वसुलीच्या तगादयापोटी आत्महत्या करण्याची वेळ येत आहे त्यामुळे बैंकेने व पोलिस प्रशासनाने थकीत मोठ्या कर्जदारावर कार्यवाही करावी जेणेकरून गोरगरिबांच्या ठेवीला धोका निर्माण होणार नाही व चेअरमन ची हुकूम शाही बंद होईल. तसेच ज्या संचालकांनी स्वतः च्या व नातेवाईकांच्या नांवे बिना कागद पत्रा आधारे कर्ज कोट्यावधी रुपयाचे कर्ज घेतले आहे त्यांच्या वरही तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत नसता आपण १५ फेब्रुवारी रोजी सकाळी वैद्यनाथ बैंके समोर उपोषणाला बसु आसा इशारा शिवसंग्राम चे बिड जिल्हा अध्यक्ष तुळशीराम पवार यांनी दिला आहे.
Add new comment