राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज भाविकांना अल्पोपहार वितरण “अमित शाह पकोडा" स्टाॅलवरून होणार वितरण 

परळी वैजनाथ : प्रतिनिधी.....
          विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसरे दिवशी भाविकांना अल्पोपहार वितरण केले जाते. या मध्ये पुरीभाजी स्टाॅल मधून होणारे अल्पोपहाराचे स्वरूप बदलत उपक्रमातून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दि. १४ रोजी  भाविकांना अल्पोपहार वितरण उपक्रम आयोजित करण्यात आला असून “अमित शाह पकोडा"स्टाॅलवरून वितरण  होणार आहे. सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
              नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर सहा कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात लाखावरही रोजगार दिला नाही. यामुळे हेच बेरोजगार आता सरकारला त्यांची जागा दाखवतील. अमित शहा यांनी बेरोजगार तरुणांचा अपमान केला आहे. या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या अल्पोपहार वाटप उपक्रमातून  राष्ट्रवादी काँग्रेसने  प्रतिकात्मक आंदोलन आज दि. १४ रोजी सकाळी ९ वाजता सेवालाल चौक ,पोलिस स्टेशन समोर आयोजित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसरे दिवशी भाविकांना अल्पोपहार वितरण केले जाते. या मध्ये पुरीभाजी हा पदार्थ ठेवण्यात येतो पण यावर्षी पकोडे वितरण करण्यात येणार आहेत.
      या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व सरकारचा प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येेने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.