लाइव न्यूज़
Add new comment
रेल्वे रुळावर महिलेचा मृत्यू ; पोलीसाकडुन ओळख पटविण्याचे अहवान
Beed Citizen | Updated: February 14, 2018 - 10:12pm
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि. १३ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात महिलेचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याचे आढळून आले. सदर प्रेत सरकारी दवाखाना येथे ठेवण्यात आलेले आहे. महिलेच्या पायाला कोड फुटलेले दिसत असून वय अंदाजे ४० वर्षे असून चेहरा अपघातात नष्ट झालेला आहे. तरी कोणाच्या घरी महिला बेपत्ता असेल त्यांनी तात्काळ संभाजीनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची पोलीस ठाण्यात नोंद केली आहे, अधिक माहितीसाठी तपासी अंमलदार राठोड (मो.नं. ८८८८१९६७८८) यांच्याशी संपर्क साधावा.