परळीत हॉटेलमध्ये प्राध्यापकाच्या आत्महत्येने खळबळ
परळी- प्रतिनिधी
—————————————
परळी शहरातील रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये एका ४१ वर्षीय प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे. अनिलकुमार होळंबे असे प्राध्यापकाचे नाव आहे.
परळीतील आर्या एक्झिक्युटिव्ह या हॉटेलमध्ये सायंकाळी अनिल होळंबे यांनी रुम घेतली. रात्री उशिरा ते रुमवर परत आले. मंगळवारी दुपारी त्यांनी आत्महत्या केल्याची सुमारास घटना उघडकीस आली. मयत इसमाच्या ओळखीचे मित्र हॉटेलमध्ये आले व फोन उचलत नाहीत म्हणून चौकशी केली.वारंवार दार ठोठवल्यानंतरही दार उघडले जात नसल्याने मग मास्टर की द्वारे खोली उघडण्यात आली. तेव्हा होळंबे यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत. अनिलकुमार होळंबे उस्मानाबाद येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.
Add new comment