Add new comment

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोपातून निर्दोष मुक्तता

प्रतिनिधी: परळी शहरातील हबीबपुरा भागातील विवाहिता शेख शाहीन शेख रफीक हिने पतीचे व सासूचे सततचे त्रासाला व पैशाच्या मागणीला कंटाळून स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली व तिस पती, सासूने आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून त्यांची येथील जिल्हा व सत्र न्यायालय न्या. एस.व्ही. हांडे यांनी दि. 25/01/2018 रोजी निर्दोष मुक्तता केली.
थोडक्यात वृत्तांत असा की, रांजणी, ता. कळंब येथील अहमद वजिर पठाण यांची मुलगी शाहीन हिचा विवाह परळी येथील हबीबपुरा भागात राहणार्‍या शेख रफीक शेख अब्दुल यांचेसोबत झाला होता. अहमद यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, माझी मुलगी शाहीन हिला नवरा व सासू सतत मारहाण करीत होते व माहेरहून धंदा करण्यासाठी रू. 50,000/- आणावेत म्हणून सतत शिवीगाळ करून मारहाण करीत असत. मुलगी माहेरी रांजणी आलेवर नवरा रफीक व सासू तस्लीमा यांचेबाबत तक्रार करीत होती म्हणून एक वेळा 10,000/- दहा हजार रूपये जावायाला देऊन चांगले सांभाळावे म्हणून विनंतीही केली होती. तरीपण काही फरक पडला नाही, तिचा छळ बंद झाला नाही.
शेवटी दि. 13/09/2014 रोजीे स्वत:ला जाळून घेऊन शाहीन हिने आत्महत्या केली, अहमद यांचे तक्रारीवरून गु.र.नं. 126/2014 दि. 14/09/2014 परळी शहर पोलिसात नोंद करण्यात आला व आरोपींना अटक करून तपासाअंती नवरा व सासू यांचेविरूद्ध कलम 306, 498-ए, 34 भा.द.वि. प्रमाणे आरोपपत्र परळी न्यायालयात दाखल झाले.
प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही. हांडे यांचे समोर होऊन पती व सासू यांची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली. पती व सासू यांची बाजू अ‍ॅड. दत्तकुमार लांब यांनी मांडली. त्यांना अ‍ॅड.सचिन शेप, अ‍ॅड.चंद्रकांत चौरे, अ‍ॅड. सुनिल हरणावळ यांनी सहाय्य केले

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.