परळीतील व्यक्तीला रोजगारासाठी मुंबई, पुणेला जाण्याची गरज पडू नये असा विकास करायचा आहे- धनंजय मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना परळी मतदारसंघात एकही उद्योग आला नसल्यामुळेच रोजगारासाठी इथल्या माणसाला आज मुंबई, पुणे या शहरांमध्ये जावे लागत आहे. आपल्या मातीतील माणसाला आपल्या भागातच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे असे माझे स्वप्न असून, या पुढच्या काळात परळी मतदारसंघातच मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार्‍या उद्योग उभारून इथल्या माणसाला रोजगारासाठी मुंबई, पुणेला जाण्याची गरज भासणार नाही, असा विकास मला करायचा असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

रोजगारानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी धनंजय मुंडे यांनी आज मुंबईच्या चेंबूर, घोडबंदर आणि नवी मुंबई भागात भेट घेतली तेंव्हा ते बोलत होते. तुम्हाला भेटायला आलो तेंव्हा एखाद्या घरात निवडक लोकांची भेट होईल असे वाटले होते, मात्र एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आला आहात की, बैठक न होता हा मेळावाच झाल्याचे लक्षात येत आहे असे उपस्थित गर्दीला पाहून मुंडे म्हणाले.

मुंबईत इतक्या मोठ्या संख्येने आपले बांधव आहेत याचा आनंद नाही तर रोजगारासाठी आपल्याला इतक्या लांब यावे लागते याचे दुःख वाटते असे ते म्हणाले. खरे तर केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि परळीचे लोकप्रतिनिधी सत्ते असल्याने परळीत एम.आय.डी.सी. किंवा एखादा मोठा उद्योग जरी आला असता तरी इतकी गर्दी या कार्यक्रमास झाली नसती. मात्र निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे आपले गाव, आपले माणसे सोडून रहावे लागते याची खंत वाटते असे ते म्हणाले

एम.आय.डी.सी. त पंकजाताईंचा खोडा

सत्तेत नसलो तरी परळी शहरात एम.आय.डी.सी. व्हावी यासाठी मी प्रयत्न केले, मात्र परळीच्या आमदारांनी त्यात खोडा घातल्याचा आरोप करून एकवेळ मला संधी मिळाली तर पंचतारांकीत  एम.आय.डी.सी. चे स्वप्न पुर्ण करू, तुम्हाला गाव सोडून कामाला जावे लागणार नाही, अशी ग्वाही देतानाच यावेळी संधी द्या तुमच्या गावी तुम्हाला रोजगार देण्याची हमी मी घेतो, असे ते म्हणाले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.