रेल्वे पोलिस कर्मचार्‍याचा पाईपचे घाव घालून खून; दोघे गजाआड

पोलिसांनी अवघ्या बारा तासा लावला छडा
परळी,(प्रतिनिधी) : शहरापासूनजवळच असलेल्या अंबाजोगाई रोडवरील एका हॉटेलच्या समोरील मोकळ्या जागेत रविवारी सकाळी नागनाथ मुंडे या रेल्वे पोलीस कर्मचार्‍याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या बारा तासामध्ये या प्रकरणाचा छडा लावत दोघांना गजाआड केले आहे. सिमेंट ब्लॉक असलेला पीव्हीसी पाईपचे घाव घालून रेल्वे पोलिस कर्मचारी नागनाथ मुंडे यांचा दोघांनी खून केल्याचे तपासात समोर आले आहे. 
नागनाथ मुंडे (रा. वडगाव ता.जळकोट जि.लातुर) हे उदगीर येथील रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते.  अंबाजोगाई रोडवर त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उहाली होती. या प्रकरणात परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी कारवाई करत सचिन बंडु फड (वय २० वर्षे), गणेश सुभाष मुंडे (वय २१ वर्षे) यांना कन्हेरवाडी शिवारातून ताब्यात घेतले अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी दिली. घटनेनंतर अवघ्या १२ तासात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मयत मुंडे दि. २३ रोजी रात्री बसस्टँडवर आले. आरोपींच्या रिक्षात बसून मला रेल्वे स्टेशनला सोडा असे म्हणू लागले, त्यावर आरोपींनी त्यांना स्टेशनजवळ असल्याने चालत असे सांगितले. त्यावेळी मुंडे यांनी शिवीगाळ केली त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना मारहाण केली. व त्यानंतर रिक्षात बसवून अंबाजोगाई रोडवर घेवून जात त्यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक असलेला पीव्हीसी पाईप घातल्याने त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या बारा तासात या प्रकरणाचा छडा लागला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पो.उपनि. वाघमारे, सचिन सानप, भास्कर केंद्र, नागरगोजे, पवार, परळी शहरचे डीबी कर्मचारी बांगर, तोटेवाड, बुट्टे, पो.नि. उमेश कस्तुरे, पोनि. पाळवदे, श्रीकांत डोंगरे, सपोनि जाधव, जमादार भास्कर केंद्रे यांच्यासह पथकाने केली.
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.