परळीत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

परळी, (प्रतिनिधी):- बंदी असतानाही वाळूची चोरून वाहतूक करणे तृक चालकाला चांगलेच महागात पडले आहे. परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दोन वेगवेगळ्या रोडने अवैध वाळु घेवुन जाणारे दोन ट्रक पकडले असुन त्यांना ५ लाख ६ हजार ५५५ रूपयांचा दंड ठोठावला आहे. तालुक्यातील टोकवाडी जवळ ३.१६ ब्रास अवैध वाळुने भरलेला ट्रक क्रमांक (एम.एच २४ जे.९२६८) तसेच धर्मापुरी रोड वर ४.१२ ब्रास वाळु असलेला ट्रक (एम.एच ९१७७) असे दोन ट्रक उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक व तलाठी राजुरे यांनी पकडले असुन दोन्ही ट्रक तहसिलला परिसरात आणले आहेत.  एका वाळुच्या ट्रकला २ लाख ४६ हजार ६८६रू तर दुसर्‍या ट्रकला २ लाख ६० हजार ८६९ रू.असा एकुण ५ लाख ६ हजार ५५५ रूपयांचा दंड ठोठावला आहे. तहसिल कार्यालयाच्या आवारात एम.एच २५ एम ५४८५ हा ट्रक उभा असुन त्यावर काय कारवाई झाली ते समजु शकले नाही. हि कारवाई दि.७ एप्रिल रोजी झालेली असुन अशा अनेक कारवाया या अगोदर सुध्दा झालेल्या असुन त्याची माहिती मात्र प्रसार माध्यमानां देण्यात आलेली नाही.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.