कवडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मोर्चेबांधणीला वेग
शेख शरीफ - वडवणी
- तालुक्यातील राजकारणात महत्वपुर्ण समजल्या जाणाºया कवडगाव ग्रामपंचायतीची निवडणुक पंधरा दिवसावर येऊन ठेपली आहे. यावर्षी प्रथमच सरपंच निवड जनतेतुन होत असल्याने स्थानिक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असुन सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण तापु लागले आहे.
या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजप आणी राष्ट्रवादी यांच्यातच कायम सत्तासंघर्ष पहावयास मिळत होता. मात्र, सध्या येथील राजकारण बदलत असल्याचे चित्र असुन सरपंच निवड थेट जनतेतुन होत असल्याने येथे तीन पॅनेल रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे सेथील राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापु लागल्याचे दिसत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशिल व वडवणी तालुक्याच्या राजकारणात महत्वाची ग्रामपंचायत म्हणुन कवडगाव ग्रामपंचायतीकडे पाहीले जाते. त्यामुळे या ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी सर्वच पक्षानी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
कवडगाव ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठीे बशीर शेख , संदीपान खळगे , यशवंत कुलकर्णी,मकसुद पठान,अकबर पठान, यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Add new comment