रस्ते विकास आराखड्यासंदर्भात विजय गोल्हार यांनी घेतली बैठक..!
आष्टी - (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा परिषद अध्यक्षपती श्री.विजय गोल्हार यांनी आज पंचायत समिती कार्यालयात अधिकारी,पदाधिकारी व सरपंचांची बैठक घेतली.साधारणत: दर 20 वर्षांनी शासनाच्या बुकलेटमध्ये गावोगावच्या मुख्य रस्त्यापासून प्रत्येक वस्तीवर जाणा-या रस्त्यांचा यामध्ये समावेश होत असतो ,तो सन 2000 साली झालेला होता आणी आता तो सन 2021ला होणार होता परंतु ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करुन आपल्या जिल्ह्यासाठी तो समावेश लवकर करण्याचा निर्णय झाला आहे.रस्त्याचा शासनाच्या बुकलेट मध्ये समावेश झाल्या नंतरच रस्त्याच्या विकासकामांवर निधी देता येतो.असे झाल्यास जास्तीत जास्त रस्ते होऊन गावच्या वस्तीरस्त्यांचा प्रश्न यांतून मार्गी लागेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. वस्तीरस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून सरपंचांनी आपापल्या गांवचे रस्ते समाविष्ट करून ही योजना फलद्रूप होण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन श्री.गोल्हार यांनी केले आहे.
Add new comment