लाइव न्यूज़
आ.भीमराव धोंडे यांनी उद्घाटन केलेल्या रस्त्याचे काम अजुनही सुरु होईना
ब्रम्हगाव, मुगगावकरांचा रस्ता रोको
आष्टी, (प्रतिनिधी):- मुगगाव रस्त्याचे उदघाटन होवूनही अद्यापपर्यंत रस्त्याचे काम सुरु न झाल्याने संतप्त झालेल्या मुगगाव, ब्रम्हगावकरांनी आज भरदुपारी नगर-बीड रोडवर पाऊण तास रास्तारोको आंदोलन केले. आ.भीमराव धोंडे यांनी या रस्ता कामाचे उदघाटन केले होते.मात्र दोन महिने होवूनही काम सुरु न झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेतला. दरम्यान एका भाजप पदाधिकार्यानेच सदरील काम अडविल्याची चर्चा आंदोलनस्थळी ऐकावयास मिळाली.
बीड-नगर रोडवर मुगगाव, ब्रम्हगाव येथील दोनशेपेक्षा अधिक लोकांनी आज भर दुपारी रास्तारोको आंदोलन केले. आ.भीमराव धोंडे यांनी २ कोटी २५ लक्ष रुपये या रस्त्यासाठी मंजुर करुन घेत स्वत: कामाचे उदघाटन केले होते. दोन महिने झाले तरी अद्यापपर्यंत काम सुरु न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रास्तारोको आंदोलन केले. यावेळी नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे, पोनि.शौकत अली सय्यद, बांधकाम विभागाचे फुले आदिंनी निवेदन स्विकारुन लेखी दिल्यानंतर रास्तारोको थांबविण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जालिंदर वांढरे, सुधीर पठाडे, केकाण, भाऊसाहेब भवर, सोपान पवार, शिवाजी सानप आदिंची उपस्थिती होती.
Add new comment