सरसकट कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे मुख्यमंञ्यांना निवेदन
मुंबई :-सरसकट कर्जमुक्तीची अंमलबजावणी करुन रेडी रेकनर नुसार नवीन शेतीकर्जाचे वाटप सुरु करा,१९ जून २०१७रोजी काढलेल्या परिपञकाप्रमाणे गायीच्या दुधाला २७ रुपये लिटरप्रमाणे भाव न देणाऱ्या दुधसंघावर कारवाई करा तसेच प्रतिलिटर १०/-रुपये प्रमाणे मागिल सहा महिन्याची फरकाची रक्कम द्या, कांद्यावरिल एम ई पी काढून शेतीमालावरिल निर्यातबंदी कायमची उठवा,बैल हत्त्याबंदी कायद्याचा फेरविचार करा,ऊसाचा पहिला हप्ता महाराष्ट्रभर समान द्या, बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम तातडीने द्यावी आणि वीजबिलासाठी शेतकऱ्यांचे वीजकनेक्शन कापू नये या मागण्याकरिता शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने मुंबईत मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर २फेब्रुवारी २०१८ रोजी भेट घेवून निवेदन दिले.
यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट,शिवाजीनाना नांदखिले,बाळासाहेब पठारे,प्रा.सुशिलाताई मोराळे,ॲड.बन्सीधर सातपुते, किशोर ढमाले,गणेशकाका जगताप,करण गायकर, डॉ.अजित नवले आदि.उपस्थित होते.
Add new comment