Add new comment

पोलिस निरीक्षकासह तिघांविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

आष्टी, (प्रतिनिधी):- महिला पोलिस कर्मचार्‍यावर अत्याचार करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह पोलिस शिपाई गडकर आणि अन्य एका विरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एका ३२ वर्षीय महिला पोलिस कर्मचार्‍याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, परळी ग्रामीण पोलिस ठाण्यातील पो.नि.हर्षवर्धन गवळी, आष्टी येथील पोलिस शिपाई उध्दव गडकर आणि खाजगी नौकरी करणारे प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे या तिघांनी वॉकीटॉकीची बॅटरी संपली आहे असे कारण काढून घरी बोलावून अत्याचार करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी महिला पोलिस कर्मचार्‍याच्या  फिर्यादीवरून तिघांविरूध्द आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत. या घटनेने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.