आष्टीत आ.धोंडेंच्या आमसभेत शेतकर्‍यांचा आक्रोश

तक्रारींचा भडीमार; शंभर शौचालये नुसते कागदावरच; कुपोषणाचा विषयही ऐरणीवर
आष्टी, (प्रतिनिधी):- शौचालयासह मुलांच्या उपोषणाचा प्रश्‍न मांडत शेतकर्‍यांनी आमसभेत आक्रोश केला. सार्वजनिक समस्यांसंदर्भात प्रत्येकाने तक्रारी उपस्थित करत आ.भिमराव धोंडे यांच्यासमोरच तक्रारींचा पाढा वाचला. या आमसभेस तालुक्यातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आष्टी येथील पंचायत समितीत आज दुपारी आ.भिमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सविता गोल्हार, सदस्य निता सतिष शिंदे, सभापती उर्मिला पाटील, डॉ.शैलेजा गर्जे, सरपंच संतोष चव्हाण, वाल्मिक निकाळजे, बबन झांबरे, अशोक साळवे, वसंत खंडागळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या आमसभेत उपस्थित शेतकर्‍यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गतच्या शौचालयांचा प्रश्‍न मांडला. तालुक्यातील शंभर शौचालय नुसते कागदावर दाखवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मनसेचे तालुकाध्यक्ष कैलास दरेकर यांनी मुलांच्या कुपोषणाचा प्रश्‍न मांडला. उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यासंदर्भात सामान्य जनतेने प्रश्‍न उपस्थित करत आ.धोंडे यांचे लक्ष वेधले. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांवरही अन्याय झाल्याची बाब यावेळी आ.धोंडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. अनेक जणांनी जिल्हा परिषद बांधकाम, पंचायत समिती,कृषी विभाग, शिक्षण विभाग, जि. प. लपा, पाणी पुरवठा विभाग, विज वितरण कंपनी अशा विविध अधिकार्यांना आम सभेत समस्या बाबत प्रश्न अजित घुले , शेळके, दादासाहेब गव्हाणे, डॉ युवराज तरटे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ता.अध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,याच्यासह अनेकांनी समस्या मांडल्या व अधिकार्यांना धारेवर धरले या मुळे आमसभा गाजली आहे.
 
पत्रकारांच्या जागेवरून आमसभेत गोंधळ 
पत्रकार भवन जागेवरून  आमसभेत प्रचंड गोंधळ गेल्या वर्षी आम सभेत पत्रकार संघाला जागा मिळावी या मागणीचा ठराव घेतला होता या प्रश्नावर आज आमसभेत आष्टीतील पत्रकारांनी चांगलाच हल्लाबोल केला परंतु काही मान्यवर नेत्यांनी मध्यस्थी केल्याने पुढिल प्रसंग टळला. आम सभेचे अध्यक्ष आ भिमराव धोंडे यांनी सांगितले की मला आम सभेत पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकारावरुन आष्टी तालुक्यातील पत्रकारांमधुन तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.