आष्टीत नगरपंचायत कर्मचार्‍यांचे गेट बंद, काम बंद

आष्टी, (प्रतिनिधी):- वेतन कायद्याप्रमाणे नगरपंचायत कर्मचार्‍यांना वेतन द्यावे, पाच वर्षापासुनची थकीत रक्कम द्यावी या मागणीसाठी नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडून गेट बंद, काम बंद आंदोलन केले.
आष्टी येथील नगरपंचायतमध्ये सफाई, पाणी पुरवठा, वसुली आदिं विभागातील कामगार ३० ते ३५ वर्षांपासुन कार्यरत आहे. मात्र किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन दिले जात नसल्याने नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांनी आजपासुन प्रवेशद्वारावरच बेमुदत उपोेषण सुरु केले आहे. गेट बंद, काम बंद आंदोलनाच्या भुमिकेमुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. आंदोलनात शिवकुमार तांबे, दिलीप निकाळजे, रतन खंडागळे, बलभीम मुरकूटे, संजय निकाळजे, चंद्रकांत मस्के आदिंसह अन्य कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला. उपोषणास रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब साबळे आदिंनी पाठिंबा दिला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.