लाइव न्यूज़
बाळासाहेब आजबेंच्या विरोधात सतीष शिंदेनी उमेदवारी दाखल केली
Beed Citizen | Updated: October 4, 2019 - 3:58pm
आष्टी (प्रतिनिधी):- येथील विधानसभा मतदारसंघात एका पाठोपाठ बंड होऊ लागले आहेत. भाजपमधील बंड नवा असतांनाच आता राष्ट्रवादीतही बंडाचा झेंडा फडकला आहे. बाळासाहेब आजबेंच्या विरोधात सतीष शिंदेनी उमेदवारी दाखल केली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या सतिष शिंदेंनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.आज दुपारी सजवलेल्या गाडीतुन सतिष शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
Add new comment