लाइव न्यूज़
आष्टी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पाच रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधीतुन ना.गडकरी मंजुरी देणार-आ.भीमराव धोंडे

आष्टी,(प्रतिनिधी):-आष्टी मतदारसंघातील प्रमुख पाच रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी मधुन मंजुरी देणार असल्याचे केंद्रीय रस्तेविकास मंत्री ना.नितिन गडकरी यांनी सांगितले असल्याची माहिती आ.भीमराव धोंडे यांनी दिली.
ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.येत्या काही दिवसात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअर्ंतगत अनेक वाड्या व छोट्या गावांचे रस्ते ना.पंकजाताई मंजुर करणार असुन केंद्रीय मार्ग निधी (CRF) मधुन आष्टी मतदारसंघातील पाच प्रमुख मार्गांना मंजुरी देण्याची मागणी केंद्रीय रस्तेविकास मंत्री ना.नितिन गडकरी यांचेकडे गेल्यावर्षी केली होती.केंद्रसरकारला या रस्त्यांचा प्रस्ताव सादर केला आहे.परंतु तेव्हामंजुर झाला नाही.म्हणुन काल नागपूर येथे ना.नितिन गडकरी यांनी आष्टी मतदारसंघातील प्रमुख पाच रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी मधुन मंजुरी देऊ असे सांगीतले आहे या प्रमुख रस्त्यांनमध्ये...हिंगणी-टाकळसिं ग-जामगाव-आष्टा-चिंचपूर- मातावळी-वनवेवाडी-चिखली ४६ कि.मी. दौलावडगांव- केळ-पिंपळघाट-मराठवाडी- देऊळगांवघाट - शेडाळा- सावरगांवघाट मच्छिंद्रनाथगड- महिंदारस्ता कि.मी.४५. साकत-लोणी-धानोरा-सुलेमानदेवळा- गंगादेवी-सावरगांव -वृद्धेश्वर रस्ता ४६ कि.मी.आल्हणवाडी-देवळाली-डों गरगण- कडा- रुईनालकोल-वाकी- रस्ता ३५ कि.मी.चिंचपुरईजदे-महिंदा-डोईठा ण-आष्टी-खडकत-रस्ता ५२ कि.मी हे प्रमुख मार्ग आहे. या संपूर्ण रस्त्यांचे रुंदीकरण होणार आहे.
Add new comment