Add new comment

स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याकडूनच अत्याचार

बीड, (प्रतिनिधी):- स्वत:च्याच अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर पित्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर  पित्याकडूनच अत्याचार होत होते. पिडीत मुलगी तिसरीमध्ये असल्यापासुन ते एप्रिल २०१८ पर्यंत पित्याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या बाबतची माहिती कोणालाही सांगू नये म्हणून तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पुणे येथील समर्थ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करुन तो आष्टी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. आष्टी पोलिस ठाण्यात पित्याविरुद्ध कलम ३७६, २, एफआयएन, ५०६ भादवीसह कलम ४, ६ बाल लैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे दि. २६ जून रोजी गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि.भुतेकर हे करीत आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.