Add new comment

पाटोदा शहरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

पाटोदा : अरुंद रस्ते त्यातच वाढलेले अतिक्रमण यामुळे बसस्थानकालगतच्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये मुख्य मार्गावरील अतिक्रमण हाटिवण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील शिवाजी चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक येथील रोड़ लगतच व्यापार्‍यांनी जास्तीची जागा धरून फळगाडे, चहाचे हॉटेल, चिकण दुकान, कुशन वर्क्स, रस्त्यावरच लोखंड़े टाकणे असे प्रकार वाढल्याने नागरिकांना ये -जा करणेही मुश्किल झाले होते. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले होते. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक माने यांनी मंगळवारी सकाळ पासुन पाटोदा पोलीस स्टेशन स्टाफ घेऊन धड़क कारवाई केली रस्त्यावरील लावलेले बॅनर ,पाईप, बाकड़े असे इ. साहीत्य पोलीस स्टेशन ला घेऊन आले व त्याच्यावर नियमानुसार दंड़ करण्यात येणार आहे. नियम डावलून जर कोणी रस्यावर अतिक्रमण करण्याचा परतायतर केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक  माने यांनी  बोलताना सांगितले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.