Add new comment

पाटोद्यात मुस्लिम बांधवांकडुन शिवजयंती मिरवणूकीवर पुष्पवृष्टी

पाटोदा  ( प्रतिनिधी) 

पाटोदा शहरातील मुस्लिम समाज बांधवा तर्फे सामाजिक सलोख्याचे व सामाजिक एकतेचे दर्शन घडवत शिवजयंती मिरवणूक राजमहंमद चौकात आल्यावर शिवजयंती  मिरवणूकीवर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर  पुष्पवृष्टी करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देण्यात आल्या.तसेच मिरवणूकीत सहभागी झालेल्या शिवभक्तासाठी लिंबु सरबताची व्यवस्थाही करण्यात आली होती. या साठी उपनगराध्यक्ष नय्युम पठाण, सभापती आसिफ सौदागर,मुन्ना अन्सार,अॅड. जब्बार पठाण,नगरसेवक शेख वशीम,नगरसेवक सय्यद शहानवाज,पत्रकार हमीद पठाण,शेख जुनेद,शेख जवाद बिल्डर,सय्यद शफ्फु शेठ,अॅड. सय्यद वहाब,शहानवाज सर,शाहरूख दादा पठाण आदी मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला. या मुस्लिम बांधवांच्या स्तुत्य उपक्रमाचे शिवभक्ताकडुन व हिंदू बांधवाकडुन कौतुक करण्यात आले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.