लाइव न्यूज़
कंत्राटी कर्मचार्यांचा उपोषणाचा आज नववा दिवस; २१ तारखेला मुंबईत आरोग्यमंत्री, वित्तमंत्री यांच्यासमवेत संघटनेची बैठक
बीड, (प्रतिनिधी):- राज्यातील १८ हजार कंत्राटी कर्मचारी यांनी दि.११ एप्रिलपासून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. बीड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून आज आंदोलनाचा ९ वा दिवस आहे. विविध मागण्यांसदर्भात कंत्राटी कर्मचारी यांनी तिव्र आंदोलन उभारले असून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा संघटनेच्या पदाधिकार्यांनी घेतला आहे. कंत्राटी कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांसदर्भात २१ तारखेला मुंबई मंत्रालय येथे आरोग्यमंत्री दिपक सावंत, वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार, प्रधान सचिव, आरोग्य आयुक्त अतांत्रिक यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचारी यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये राज्यातील १८ हजार कंत्राटी कर्मचार्यांनी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. बीड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्यांनी या कामबंद आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असून आंदोलनाचा आज ९ वा दिवस आहे. २१ तारखेला होणार्या बैठकीमध्ये कंत्राटी कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा होणार असून मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तिव्र करण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री बीड जिल्हा दौर्यावर असून अंबाजोगाई येथे होणार्या कार्यक्रमात कंत्राटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री यांना भेटणार असून त्यांच्या मागण्याचे निवेदन देणार आहेत.
Add new comment