बीड शहर

बीडमध्ये विकास मंचची निदर्शने

बीड,(प्रतिनिधी) पीककर्जासाठी शेतकर्‍यांच्या पत्नीकडे शरीरसुखाचि मागणी करणार्‍या बुलढाणा जिल्ह्यातील सेंटृल बँक दाताळ शाखेचां मॅनेजरला कठोर शासन करावे या  मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी सेंटृल बँक बीड शाखेसमोर आज जोरदार निदर्शने केली 

सीओ जावळीकरांनी कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्‍न निकाली काढला

बीड, (प्रतिनिधी): नगर पालिकेतील कर्मचार्‍यांचे वेतन सात ते आठ  महिन्यांपासून प्रलंबीत होते. या प्रश्‍नी सीओ धनंजय जावळीकर यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार लेखा विभागात सुचना देवून हा प्रश्‍न निकाली काढला, त्यामुळे कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुरेश धस हुकमी एक्का; धनंजय मुंडेंना धक्का

बीड, (प्रतिनिधी):- तब्बल १८ दिवसापासुन लांबणीवर पडलेल्या बहुप्रतिक्षित बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निकाल आज जाहीर झाला. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळेंचा ७४ मतांनी पराभव करत सत्तेच्या वलयात उडी घेतली आहे. १००४ मतांपैकी धस यांना ५२६ तर जगदाळेंना ४५२ मते पडली.

समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी वृंदावन वस्तीगृहात मोफत शिक्षण व राहण्यासाठी व्यवस्था-ऍड.युवराज बहिरवाळ

बीड, (प्रतिनिधी):- मौजे पिंपळवाडी ता.जि.बीड येथे गुरुकुल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत वृंदावन वस्तीगृह, पिंपळवाडी हे निसर्गरम्य वातावरणात गेल्या वर्षीपासुन सुरु झाले असुन समाजातील अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे मुले तसेच समाजातील वंचित घटकातील विद्यार्थींना मोफत राहणे, खाणे व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सन २०१६-१७ व २०१८-१९ या वर्षांसाठी आतापर्यंत ८८ मुलाचे प्रवेश झालेले आहेत.

मतदाना बाबत सोमवारी तर अपात्रतेबाबत सुनावणी मंगळवारी

बीड प्रतिनिधी:-
कचरा फेक प्रकरणातील आघाडीच्या अपात्र नगर सेवकांची मते ग्राह्य धरावी की नाही याबाबतचा निकाल सोमवारी तर त्यांच्या अपात्रतेचा बाबत सुनावणीआता मंगळवारी होणार आहे,आज याबाबत औरंगाबाद खंडपीठात झालेल्या चर्चे नन्तर न्यायालयाने निर्णय दिला आहे

डॉक्टरचे आठ लाख रुपये लंपास करून रुग्ण पसार !

बीड, (प्रतिनिधी):-आजारी असल्याचा बहाणा करून डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णाने संधी साधून डॉक्टरच्या टेबलच्या ड्रॉवरमधून आठ लाखांची रक्कम घेऊन घेऊन पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी बीड शहरात उघडकीस आली.

रुग्ण पळवा-पळवी प्रकरणातील महिलेचा मृत्यू

सीएस साहेब, आता तरी डॉ.मुंडेंविरुद्ध तक्रारीची दखल घेणार का?

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको

माजलगाव, (प्रतिनिधी): शेतकर्‍यांच्या तुरी आणि हरभरा खरेदीचे पैसे तात्काळ शेतकर्‍यांना द्या, या प्रमुख मागणीसाठी आज माजलगाव येथील  महामार्ग क्र. २२२ गढी रोड माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली अडवण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने रस्ता रोको करून सरकारला शेतकर्‍यांच्या भावना कळवल्या आहेत. 

चांगलं काम करणार्‍या अधिकार्‍यांना शाबासकी ऐवजी चक्क नोटीस!

बाळाचे प्रकरण; डिवायएसपींनी बजावली पोनि. सय्यद यांना नोटीस
म्हणे, गोपनियता भंग झाली; 

हुज्जज कमिटीच्यावतीने शनिवार दि.२ जून २०१८ रोजी मार्गदर्शन शिबीर

बीड, (प्रतिनिधी):- येथील मर्कज खिदमत हुज्जाज कमिटीच्यावतीने हज येथे जाणार्‍या मुस्लिम बांधवांसाठी मंगळवार दि.२ जुन २०१८ (मुताबीक १७ रमजानुल मुबारक १४३८ हिजरी) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती हज कमिटीचे चेअरमन महंमद याकुब यांनी दिली आहे.

सीओ साहेब, बुकं छापायलाही पैसे नाहीत का?; जनतेचा सवाल

बीड, (प्रतिनिधी):- येथील नगरपालिकेतील वसुली विभागात गेल्या एक महिन्यापासुन पीटीआर बुक संपल्याने लोकांनो त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. पीटीआर बुक नसल्याने पालिकेचा लाखोंचा महसुलही बुडत आहे. असे असतांनाही मुख्याधिकारी जावळीकर याकडे दुर्लक्ष करत आहेत. तब्बल महिनाभरापासुन पीटीआर बुक छापले जात नसल्याने सीओ साहेब, बुक छापायलाही पालिकेकडे पैसे नाहीत का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

पोनि. सय्यद सुलेमान यांच्या शहर ठाण्याचे सितारे चमकले एसपींच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र प्रदान

बीड, (प्रतिनिधी):- येथील शहर पोलिस ठाण्याचे सितारे चमकले असुन पोनि.सय्यद सुलेमान यांच्या कार्यकाळात ठाण्याला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपअधिक्षक सुधीर खिरडकर यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र पोनि.सुलेमान आणि त्यांच्या टीमला प्रदान करण्यात आले.

बीडमध्ये अभियंत्यावर पिस्तुल रोखले

बीड, (प्रतिनिधी):- एका व्यापार्‍याशी झालेल्या व्यवहारानंतर ते भेटत नसल्याने त्यांच्याविषयी अभियंता प्रशांत संचेती यांना माहिती विचारत त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पेठ बीड भागात दि.२० मे रोजी घडला आहे. या प्रकरणी अशोक रोमन यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळनेर हद्दीत झाडांची कत्तल; अज्ञात माथेफिरुविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

बीड, (प्रतिनिधी):- पिंपळनेर परिसरातील नाळवंडी शिवारात अज्ञात माथेफिरुने लिंबाच्या झाडाची कत्तल केल्याची घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली आहे. अज्ञात माथेफिरुने लिंबाचे झाड कटरने कापुन शेतकर्‍याचे नुकसान केले आहे. जवळपास २५ हजार रुपये किंमतीच्या झाडाची कत्तल झाल्याने शेतकर्‍याने अज्ञात माथेफिरुविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे.

Pages