लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विडा महसूल मंडळात अतिवृष्टी
Beed Citizen | Updated: July 8, 2018 - 2:57pm
बीड, (प्रतिनिधी):- पंधरा दिवसापासुन दडी मारलेल्या पावसाने जोरदार कमबॅक करत सर्वदूर हजेरी लावली. आज सकाळीही ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. विडा महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. पावसामुळे पिकांना जिवदान मिळाले आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत २३.६१ टक्के पाऊस झाला आहे.
बीड जिल्ह्यात काल दुपारपासुन पावसाची ठिकठिकाणी सुरुवात झाली. तब्बल १५ दिवसांपासुन दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. पहिल्या पावसावर ज्यांनी पेरणी केली होती. त्यांच्यावर पाऊस पडत नसल्याने दुबार पेरणीचे संकट आले होते. मात्र कालच्या पावसाने पिकांना जिवदान मिळाले आहे. बीड तालुक्यात आज सकाळपर्यंत ३५.४५, पाटोदा २५.७५, आष्टी ७.४३, गेवराई ११.५०, शिरुर कासार २८.३३, वडवणी १०.००, अंबाजोगाई ५.८०, माजलगाव २१.००, केज ४२.००, धारुर २१.०० मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १८.९ मीमी पाऊस झाला असुन केज तालुक्यातील विडा महसुल मंडळात तब्बल ८७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत १ जून ते ८ जूलैपर्यंत २३.६१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मोठे प्रकल्प भरण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.
Add new comment