बीड शहर

खंडेश्वरी परिसरात कोणतीही दुर्घटना नाही.

बीड :-( प्रतिनिधी) 

खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात भरलेल्या यात्रेत कुठलीही दुर्घटना घडली नाही असे मंदिर विश्वस्त समिती आणि व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर एक कुठलीतरी क्लिप व्हायरल केली जात असून असे काहीही घडलेले नाही.

महिलेचा मृत्यू झाला आहे ही बातमी खोटी आहे अशी कोणतीही घटना घडली नाही.

खंडेश्वरी मंदिर येथे महिलेचा मृत्यू झाला आहे ही बातमी खोटी आहे अशी कोणतीही घटना घडली नाही. तरी कृपया सदर प्रकारची बातमी व्हायरल होत असेल तर ती डिलिट करावी व व्हायरल होऊ देऊ नये.

पत्रकार शेख तालेब यांनी भरला उमेदवारी अर्ज

बीड (प्रतिनिधी):- सामाजीक कार्याच्या माध्यमातुन आपली ओळख निर्माण करणार्‍या पत्रकार शेख तालेब यांनी आज दुपारी अत्यंत साध्या पद्धतीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 

ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आ.क्षीरसागरांनी घेतली व्यापक बैठक

बीड (प्रतिनिधी )ः- सध्याची भिषण परिस्थिती लक्षात घेता वीज, पाणी, जनावरांचे संगोपन, छावणी चालकांच्या समस्या, अन्न धान्य पुरवठ्याची समस्या जाणून घेण्यासाठी बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील सर्व सरपंच, उपसरपंच, छावणी चालक, रेशन दुकानदार यांची व्यापक बैठक घेऊन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले. 

हजरत शहेनशाह वली (रहे.) ऊर्स निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

बीड (प्रतिनिधी) सालाबादाप्रमाणे या वर्षीही
 हजरत शहेनशाह वली (रहे.) ऊर्स निमित्त उद्या सायंकाळी पाच वाजता किलामैदान बीड येथुन संदल मिरवणूक निघून मुख्य रस्त्याने बलभीम चौक - जुना बाजार - चांदणी चौक ते दर्गाह येथे रात्री नमाज ईशा 8.00 वाजेपर्यंत पोहचेल. त्या ठिकाणी समारोप होणार आहे.
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 :00 (नमाज ईशा) नंतर महफिल समा चे आयोजन करण्यात आले आहे  सदरील कार्यक्रमाला सोलापूर येथील मोईन व मुन्ना
कव्वाल यांच्या कव्वाली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समितीचे अध्यक्ष के. जी. एन.

जामखेड तालुक्यात स्वाईनफ्लू चा तिसरा बळी

जामखेड प्रतिनिधी
वंजारवाडी येथील आठ महीण्यांची गरोदर महिलेचा मृत्यू.

बीडमध्ये दुध वाहतुक करणार्‍या वाहनांची हवा सोडली

बीड,(प्रतिनिधी):- दुधाला ५ रुपये प्रतिलिटर दरवाढ देण्याच्या मागणीवरुन आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवले. राज्यभरात आंदोलनाचा भडका उडाला असुन दुध रस्त्यावर ओतून देण्यात आले. बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुध घेऊन जाणार्‍या टँकरची हवा सोडून दिली. एका रिक्षामधुन दुधाच्या पाकीटांची वाहतुक होत असल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी रिक्षा अडवून त्यातील पाकिटे काढून घेतली.

वडवणीत भरदिवसा वीस तोळे सोन्याची लुट सराफा दुकानातील टेबलवर ठेवलेली पिशवी पळवली

वडवणी, (प्रतिनिधी):- सराफा व्यापार्‍याने दुकान उघडल्यानंतर साफसफाई करत असतांना २० तोळे सोने व तीस हजार रुपयांची रक्कम असलेली असलेली पिशवी तेथीलच टेबलवर ठेवली असता अज्ञात चोरट्याने पिशवी पळवून नेल्याचा प्रकार आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून चोरट्याचा शोध सुरु केला असुन दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

शिक्षण संस्था संघाचे जिल्हाकचेरीसमोर धरणे

बीड, (प्रतिनिधी):- शासनाने पवित्र पोर्टलनुसार भरती करण्याचे जाहीर केले आहे. सदरील अधिकार शिक्षण संस्थांचा असुन तो निर्णय शासनाने मागे घ्यावा, २० टक्के पात्र अनुदानित शाळांना टप्प्यानुसार १०० टक्के अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांसाठी बीड जिल्हा शिक्षणसंस्था संघाच्यावतीने आज जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

खजाना विहिर नामशेषेे होण्याच्या मार्गावर

बीड, (प्रतिनिधी):- ऐतिहासिक दृष्ट्या पुरातन विभागाच्या नोंदीमध्ये अनन्य साधारण: महत्व असाणार्‍या खजाना विहिर पुरातन विभागाच्या दुर्लक्षतेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. खजाना विहिरीची देखभाल नसल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक विहिरीत केरकचरा टाकत घाण पसरवत असल्याने  एकेकाळी शहराची तहान भागवणारी खजाना विहिर घाणीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे.

कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

कोल्हापूर, (प्रतिनिधी):- कोल्हापुरात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालीय.  दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही  कारवाई सुरू केलीय. उद्यापासून स्वाभिमानीचे दूध दर आंदोलन सुरू होणार आहे. सरकारकडून दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेनं केला आहे.  कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत २५ हून अधिक कार्यकर्त्यांना  ताब्यात  घेतले आहे.

विकासाची प्रक्रिया चालूच राहणार- डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीड,(प्रतिनिधी)ः- शहरातील सर्वच रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे होणार आहेत तत्पुर्वी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आणि नाल्यांची कामे चालू आहेत. ज्या भागात मुलभूत सुविधा पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले त्याची आज पुर्तता करत असताना समाधान होत आहे. एकता नगर वासियांनी अशीच एकी ठेऊन विकास प्रक्रियेसाठी सहकार्य करावे. शहरातील विकासाची ही प्रक्रिया चालूच राहणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

नगराध्यक्षांच्या संकल्पनेला स्वच्छता निरिक्षक गायकवाड यांची साथ

बीडमध्ये ठिकठिकाणी कुंडीत झाडे लावली; दिवसातून दोन वेळा येणार घंटा गाड्या
बीड, (प्रतिनिधी):- नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या संकल्पनेला प्रभारी स्वच्छता निरीक्षक महादेव गायकवाड यांची साथ मिळू लागली आहे. गायकवाड यांनी स्वत: पुढाकार घेत ज्याठिकाणी अस्वच्छता होती तिथे सफाई मोहिम राबवून ठिकठिकाणी कुंडीत झाडे लावली आहेत. 

मराठवाडा दौर्‍यातून होणार नव्या ठाकरेंची एण्ट्री; मनसेचा असेल हा मास्टर प्लॅन

मुंबई, १५ जुलैः महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यात ठाकरे कुटुंबियांचं असलेलं वजन याबद्दल सारेच जाणून आहेत. आता या राजकारणात ठाकरे कुटुंबियांतील अजून एक व्यक्ती दमदार एण्ट्री करायला सज्ज झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे राजकारणात लवकरच प्रवेश करणार आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. मात्र अमित यांचा राजकारणातील श्रीगणेशा कधी होणार हे काही खात्रीपूर्वक सांगता येत नव्हते.

बीडमध्ये विद्यार्थ्यांना आधारची सक्ती करत परिक्षेपासून रोखले

बीड, (प्रतिनिधी):- गुप्तवार्ता विभाग (एसआयटी)च्यावतीने आज अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परिक्षा होती. शहरातील यशवंतराव चव्हाण पॉलटेक्निक कॉलेजमध्ये असलेल्या परिक्षा केंद्राची जबाबदारी खाजगी संस्थेवर सोपविण्यात आली होती. याठिकाणी वेळ झाल्यानंतर पाच मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेत न बसू देता त्यांना गेटवरच रोखले. एवढेच नव्हे तर एका विद्यार्थीनीला आधार कार्डची सक्ती करत तिलाही परिक्षेपासून रोखले.

बळीराजा चिंतेत; दररोज ढग येतात तरीही पाऊस पडेना

बीड, (प्रतिनिधी):- गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दररोज काळेकुट्ट ढग येतात तरीही पाऊस पडत नसल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. अजुनही पुर्ण पेरण्या झाल्या नसुन ज्यांनी लागवड केलेली आहे. ते देखील पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. बहुतांश प्रकल्पातील पाणीसाठ्याने तळ गाठलेला आहे. पाऊस केंव्हा पडेल या अपेक्षेने बळीराजा अजुनही ढगाकडे टक लावून बसलेला आहे.

केंडे पिंप्री प्रकरणात पोलिसांची उच्चस्तरीय चौकशी करा-भारिप बहुजन महासंघ

बीड, (प्रतिनिधी):- वडवणी तालुक्यातील केंडे पिंप्री येथील शिंदे कुटूंबियांवर जमिनीच्या वादातून हल्ला झाला. या प्रकरणात मारहाण करणार्‍यांनीच शिंदे कुटूंबियांवर कलम ३०७ प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत. सदरील प्रकरणात वडवणीचे पोलिस अधिकारी शिंदे कुटूंबियांविरुद्ध असल्याचा आरोप करत भारिप बहुजन महासंघाने उपविभागीय पोलिस अधिकार्‍यासह वडवणीच्या पोलिस निरिक्षकांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

रिक्षा चालकानेच प्रवाशाला लूटले बीडमधील प्रकार; तासाभराच्या आत चालक गजाआड

बीड, (प्रतिनिधी):- रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाला चालकानेच लुटल्याचा प्रकार काल सायंकाळी शहरातील नगरनाका परिसरात घडला. प्रवाशाने पोलिसात तक्रार देताच तासाभरात पोलिसांनी रिक्षा चालकाला गजाआड केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही- राज्य सरकार

नागपूर, (प्रतिनिधी):- मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. जर मल्टिप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी घालत असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारने विधीमंडळात आज स्पष्ट केलं आहे.

Pages