बीड :- (प्रतिनिधी)
बीड विधानसभेचे शिवसेना- भाजप- रिपाई- रासप- रयतक्रांती महायुतीचे उमेदवार ना.जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांची दि 10 आकटोबर गुरुवार रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,सुधाकर मिसाळ, वैजनाथ मिसाळ, वैजनाथ तांदळे, रामराव खेडकर यांनी केले आहे