आ. रोहित पवारांनी पाठवले पाच ट्रक धान्य

 

 

जामखेड (प्रतिनिधी) : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे अल्पकालावधीसाठी स्थलांतरीत झालेल्या व निराधार,मजुर, हातावर पोट असणाऱ्या कर्जत-जामखेडच्या लोकांना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन सुमारे पाच ट्रक धान्य आज (रविवार दि.१२ रोजी) कर्जत येथे पोहोच झाले. मतदारसंघातील हजारो गरजू लोकांना साधारणतः सात ते आठ दिवस पुरेल एवढे हे गहू व डाळ असे हे जीवनावश्यक धान्य कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे व त्यांच्या विभागाकडे पोहोच करण्यात आले आहे.

ज्यांना आवश्यता आहे अशा लोकांना प्रशासनाच्या माध्यमातुन हे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लोकं आहे त्या ठिकाणी अडकून पडले आहेत.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणेही शक्य नाही त्यामुळे जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले धान्य उपलब्ध होणे कठीण होऊन बसले आहे आणि उपलब्ध झालेच तरी सध्या लॉकडाऊनच्या कालावधीत धान्य विकत घेणे व बाहेरून आणणे सहजशक्य नसल्याने अशावेळी आमदार पवार यांच्या माध्यमातून घरपोच होणाऱ्या या धान्यामुळे हजारो गरजूना दिलासा मिळणार आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.