बीड जिल्ह्यात भाजपच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
एनआरसी आणि कॅबचा विरोध ; तालुकाध्यक्षांनी राजीनामे न स्वीकारल्याने राजीनाम्याची होळी ; भाजप विरोधी घोषणा
माजलगाव दि.19 (प्रतिनिधी )
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील भाजपच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या सर्व पदाचे, सदस्यत्वाचे राजीनामे दिले. भाजपने घटनाविरोधी विधेयक मंजूर केल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान तालुकाध्यक्ष हनुमान कदम यांनी राजीनामे घेण्यास नकार दिल्यानंतर भाजपच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी भर चौकात राजीनामे पत्र जाळून पदांचा त्याग केला.
माजलगाव येथे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देवून कॅब आणि एनआरसीचा निषेध केला. सामुहिक राजीनामे घेण्यास तालुकाध्यक्ष हनुमान कदम नकार दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राजीनाम्याची होळी करून भाजप निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष इम्रान खान, माजी नगरसेवक रफिक तांबोळी, भाजपा नेते मोबीन खान पठाण, भाजपा अल्पसंख्याक शहराध्यक्ष राजु कुरेशी, दक्षता समिती सदस्य शेख सादेक, इम्रान खान , जलाल पठाण, सचिन कराळे, बुथप्रमुख अतिक तांबोळी, अजीम खान पठान, फेरोज इनामदार, नविद मुस्ताक, आमेर मोहियोद्दीन खतीब, फेरोज खान पठान, शाहेद खा अताउल्ला खा, शेख जुनेद शेख मोहम्मद, सलीम बेग सालार बेग, जमील खा दाउद खा, शाहेद बेग हुसेन बेग, अमजद खा पठाण, शहेबाज बाबु शेख, खदीर रहीम शेख, शेख मुजफ्फर अन्वर आदी उपस्थित होते.
Add new comment