रेशन दुकानांविषयी शंका असल्यास तहसीलशी संपर्क करा- तहसीलदार अंबेकर
बीड दि.१२ ( सिटीझन )- शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे विहित वेळेत कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य पुरवठा करण्यात येत आहे .सर्वसामान्य जनतेस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये स्वस्त धान्य दुकानांबाबत (रेशन) शिधापत्रिका धारकांना काही शंका असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.
बीड शहर व तालुक्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकाना सर्व स्वस्त धान्य परवानाधारकांना माहे एप्रिल 2020 चे नियमित अन्नधान्य पुरवठा करण्यात आला आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत ५ किलो प्रती व्यक्ती तांदूळ वितरित करण्यात येत आहे.
तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये शेतकरी योजनेचे धान्य पुरवठा २-३ दिवसात करण्यात येणार आहे.
दुकान निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित
स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना नियमाप्रमाणे धान्य वितरित करीत नाहीत. स्वस्त धान्य दुकान बंद ठेवत आहेत कार्डधारकांना पावती देत नाहीत धान्य कमी देत आहेत अशा बीड शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १४,०३,३४,४१आणि घोसापुरी स्वस्त धान्य दुकानदार यांच्या विरुद्ध तहसीलदार अंबेकर यांनी यापूर्वीच दुकान निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित केली आहे.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन व संचार बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे छोटे-मोठे उद्योग व रोजगारासाठी संपूर्ण व्यवहार बंद असल्याने नागरिकांसाठी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर आवाहन केले आहे.
Add new comment