बीड जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्ण नाही
बीड दि.13 ( सिटीझन ) येथील जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डातील दोन संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सर्वांना प्रतीक्षा होती ती गेवराई तालुक्यातील ' त्या ' संशयित रुग्णाच्या अहवालाची.मात्र आज सकाळी त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील पाटोदा आणि माजलगाव तालुक्यातील दोन संशयित रुग्णांच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
त्या दोघांचेही रिपोर्ट रात्री उशिरा निगेटिव्ह आले आहेत. त्र््र्र्र गेवराई तालुक्यातील एका गावातील संशयित रुग्ण काल स्वतःहून तपासणीसाठी दाखल झाला होता. त्याचेही स्वब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.आज आज सकाळी त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला. हा संशयित रुग्ण जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावातील असल्याने जिल्हा वासियांची धाकधूक वाढली होती आता मात्र त्याच्या रिपोर्टमुळे दिलासा मिळाला. त्या संशयित रुग्णाच्या संपर्कातील 31 जणांना कालच होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 121 जणांच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते मात्र सर्व निगेटिव्ह आहेत. एकमेव आष्टी तालुक्यातील रुग्ण वगळता जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण नाही, ही बाब जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासनासाठीही दिलासदायी आहे.
Add new comment