बीड शहर

अल्लाहची उपासना सर्वांना संकटातून बाहेर काढणारी ठरो - ना. धनंजय मुंडे

नमाज व ईफ्तार कुटुंबियांसोबत घरातच अदा करण्याचे आवाहन

परळी दि.24 ( सिटीझन) मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला दि.25 पासून सुरुवात होत असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र महिन्यात अल्लाहची उपासना देशासह जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढणारी ठरावी असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच या पवित्र महिन्यात करण्यात येणारे नमाज पठण, ईफ्तार आदी धार्मिक विधी घरातच आपल्या कुटुंबियांसमवेत करावेत असे आवाहनही ना. मुंडे यांनी केले आहे.

आमदारांच्या घरी गोड बातमी !

अक्षय आणि नमिता मुंदडा दाम्पत्याला कन्यारत्न

अंबाजोगाई दि.24 (सिटीझन )-: केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांना आज पहाटे कन्यारत्न झाले. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या घरातील या नव्या पाहुण्याच्या आगमनाची आणि स्वत:ला आजोबा पदी बढती मिळाल्याची माहिती फेसबुक पोस्टमधून दिली आहे.

बीड येथील जेष्ठ नगरसेवक खदीरभाई जवारीवाले यांचे निधन

आज दुपारी 3 वाजता दफनविधी
बीड दि.24 ( सिटीझन ) शहरातील ज्येष्ठ नगरसेवक अब्दुल खदीर अब्दुल गणी (खदीरभाई जवारीवाले ) यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 54 वर्षांचे होते. आज शुक्रवारी  दुपारी 3 वाजता तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना झिरो , आष्टीच्या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह - डॉ.थोरात

बीड दि.23 ( सिटीझन) आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कोरोनाग्रस्तावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक।थोरात यांनी आज व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. नागरिकांनी अजूनही सर्व नियम पाळावेत आणि सुरक्षित राहावे असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले. 

बीडमध्ये चक्क ॲम्बुलन्समधून प्रवाशी वाहतूक , गुन्हा दाखल

बीड दि.23 ( सिटीझन ) कोरोना साथीच्या संचार बंदी काळात रुग्ण नसलेल्या इसमांची प्रवाशी वाहतुक करणाऱ्या अॅम्बुलन्सवर कारवाई करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना मोफत खत ,बियाणे द्या- आ.नमिताताईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंबाजोगाई दि.23 ( सिटीझन ) लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र व नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. अगोदरच विविध कारणाने संकटात सापडलेला शेतकरी हातघाईला आला आहे. त्यांचे अर्थचक्र पूर्णत: कोलमडल्याने शासनाने शेतकऱ्यांना मोफत खत व बियानेचा पुरवठा खरीप हंगामासाठी करावा अशी मागणी भाजपच्या आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण न करण्याचे आदेश

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिक्षकांनी मुख्यालय न सोडण्याचे सूचना 
बीड दि.23 ( सिटीझन ) कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून  दि.1 मे 2020 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त  कोणत्याही शाळेत ध्वजारोहण करु नये असे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पाठवले आहेत. 

जामखेडहून पाटोदा व आष्टी तालुक्याकडे येणारे सर्व मार्ग प्रत्येकासाठी व पुढील 14 दिवस सर्व सेवांसाठी कडकपणे बंद केले आहेत. *

 

बीड (प्रतिनिधी):-  

बीड (प्रतिनिधी):-  जामखेडहून पाटोदा व आष्टी तालुक्याकडे येणारे सर्व मार्ग प्रत्येकासाठी व पुढील  14 दिवस सर्व सेवांसाठी कडकपणे बंद केले आहेत.  राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. जामखेडमध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते.

जामखेडहून पाटोदा व आष्टी तालुक्याकडे येणारे सर्व मार्ग प्रत्येकासाठी व पुढील 14 दिवस सर्व सेवांसाठी कडकपणे बंद

बीड (प्रतिनिधी):-  जामखेडहून पाटोदा व आष्टी तालुक्याकडे येणारे सर्व मार्ग प्रत्येकासाठी व पुढील  14 दिवस सर्व सेवांसाठी कडकपणे बंदराहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. जामखेडमध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते.

संपादक गंमत भंडारी यांना जामीन

बीड (प्रतिनिधी):- दै.पार्श्वभुमीचे संपादक गंमत भंडारी यांना काल रात्री अटक झाली होती. आज दुपारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला. 

बीड जिल्ह्यात वृत्तपत्रे वितरणास परवानगी - जिल्हाधिकारी रेखावार

बीड दि.21 ( सिटीझन ) राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये वृत्तपत्रांच्या छपाईस परवानगी देत वितरणासाठी मात्र सक्त मनाई करण्यात आली होती. मात्र मंगळवारी रात्री 9.30 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात वृत्तपत्र वितरणासाठी परवानगी दिली आहे. 

बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कंट्रोल रूम - एसपी. पोद्दार

बीड दि.21 ( सिटीझन ) पश्चिम महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यावरून जिल्ह्यातील ऊसतोड बांधव आपल्या कुटुंबियांसह परत येत आहेत.त्यांच्या सुविधेसाठी स्पेशल कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे .याठिकाणी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ऊसतोड कामगारांसोबत असलेल्या गट प्रमुखाने बीडकडे येत असताना आपल्या वाहनाचे लोकेशन या कंट्रोलला देणे आवश्यक आहे.कोणत्याही ठिकाणी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे लोकेशन घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात आज दुपारपर्यंत 6 हजार 740 ऊसतोड कामगार परतले

बीड दि.21 ( सिटीझन ) राज्यातील विविध  साखर कारखान्यांमध्ये अडकलेले ऊसतोड कामगार जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी दुपारपर्यंत 6 हजार740 ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

डॉ. भारतभूषण म्हणाले, मदत देतानाचे फोटो काढू नका, व्हायरल करू नका

बीड दि.20 ( सिटीझन ) येथील नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सहकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी गरजूंना मदत देतानाचे फोटो काढू नका,  सोशल मीडियावर व्हायरल करू नका असे आवाहन आज आपल्या फेसबुक पेजवरून केले आहे. 

बीड जिल्ह्यातील एपीएल केशरी कार्डधारकांसाठी मे महिन्याचे नियतन मंजूर

 बीड दि.19 ( सिटीझन ) जिल्ह्याकरिता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल केशरी शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या केसरी शिधापत्रिकाधारकांना मे 2020 साठी सवलतीच्या दराने स्वस्त धान्य नियंत्रणाचे मंजूर झाले आहे. पात्र कार्डधारकांसाठी स्वस्त धान्य नियतन मंजूर करण्यात आले आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश  आघाव  पाटील यांनी कळविले आहे
      हे नियतन परळी वैजनाथ व अन्न महामंडळ नागपूर येथील डेपोमधून उचल करण्यात आले असून त्यांचे आकडे किंटल मध्ये पुढील प्रमाणे आहेत

रमजानमध्ये नमाज आणि ईफ्तारही घरातच - जिल्हाधिकारी ; मस्जिदमधुन केवळ अजानच होईल - एसपी पोद्दार

बीड (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी काल मुस्लिम धर्मगुरूंची रमजानच्या पार्श्‍वभुमीवर बैठक घेतली. आत्तापर्यंत ज्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे रमजानमध्येही प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा, सुरक्षीत रहा असे आवाहन केले. रमजानमध्येही ईफ्तारनंतर नमाज घरातच अदा करावी असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. तर मस्जिदमधुन केवळ अजानच होईल.

Pages