बीडमध्ये व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनसह तिघांना अटक ; सोशल मीडियावरील पोस्ट अंगलट

बीड दि.29 ( सिटीझन )  सोशल मीडियातून अफवा पसरविल्या प्रकरणी व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन सह तिघांविरुद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे

पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये दि.28 एप्रिल रोजी पो.ना.राहुल गुरखुदे यांच्या फिर्यादीवरून फेसबुकवरून जाणीवपूर्वक मीडिया आणि प्रशासन यांच्याविरोधात द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या समीर सरकार या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केल्याप्रकरणी शेख समीर शेख सत्तार ( 24, रा.बीड ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. त्याचबरोबर दि.29 एप्रिल रोजी गुन्हयातील फिर्यादीने सांगितले की, समीर सरकार याच फेसबुक अकाऊंटवरून सदरील पोस्ट सय्यद खय्युम सय्यद जमीर याने M. Khan नावाच्या व्हाट्सएप ग्रुपवर पोस्ट केली.त्यामुळे सदरील पोस्ट करणारा व त्या ग्रुपचा अडमिन सलीम जावेद शेरखान  ( 30, रा.बीड ) याने सदरची पोस्ट करण्यास ग्रुप अडमिन म्हणून संमती दिलेली आहे. म्हणून दोघांनाही या गुन्ह्यात आरोपी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असुन पुढील तपास सपोनि. के.बी.भारती हे करीत आहेत. दरम्यान आतापर्यंत अफवा पसरविल्या प्रकरणी 34 आरोपींविरुद्ध वेगवेगळे 32 गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.