Add new comment

आमदारांच्या घरी गोड बातमी !

अक्षय आणि नमिता मुंदडा दाम्पत्याला कन्यारत्न

अंबाजोगाई दि.24 (सिटीझन )-: केज विधानसभा मतदार संघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांना आज पहाटे कन्यारत्न झाले. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या घरातील या नव्या पाहुण्याच्या आगमनाची आणि स्वत:ला आजोबा पदी बढती मिळाल्याची माहिती फेसबुक पोस्टमधून दिली आहे.

आ. नमिता मुंदडा या सध्या मुंबईत आहेत. आज शुक्रवारी पहाटे मुंबई येथील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती अक्षय मुंदडा यांनी दिली. मुलीच्या आगमनामुळे कुटूंबामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, या गुड न्यूजसाठी मुंदडा कुटूंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.