बीड शहर

बीड शहरातील संभाजी नगर, बालेपीरच्या काही भागात कंटेंनमेंट झोन घोषित

बीड दि.24 ( सिटीझन ) शहरातील संभाजीनगर बालेपीर येथील चार व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती कोरोना, विषाणूचे लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रेखावार यांनी काही भागात कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. आजपासून हा भाग पुढील अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यात आज पुन्हा तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 33 झाली

बीड दि.23 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून आज 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 39 निगेटिव्ह आले असून 1 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी.पवार यांनी दिली आहे. 

बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : 16 कापुस खरेदी केंद्रांवर ग्रेडर नियुक्त

बीड, दि. २३ ( सिटीझन )जिल्ह्यातील एकुण  १६ कापुस खरेदी केंद्रांवर  प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी यांची पुढील आदेशापर्यत ग्रेडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या.विभागीय कार्यालय, परळी वै.जि.बीड यांचे नियंत्रणात व सुचनेनुसार ग्रेडींगचे कामकाज दि.२६मे २०२० पासुन करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 

बीड जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 30 झाली

बीड ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून 42 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी रात्री उशीरा 35 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यामध्ये  जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये काल रात्री मयत झालेल्या तरुणाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.

बीड जिल्ह्याला मोठा दिलासा ; 42 पैकी 35 रिपोर्ट निगेटिव्ह तर 7 प्रलंबित

बीड दि.22 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून 42 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी रात्री उशीरा 35 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात 29 रुग्णच कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये काल रात्री मयत झालेल्या तरुणाचा रिपोर्टही प्रलंबित असल्याचे  आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता कालचे 3 आणि आजचे प्रलंबित 7 असे 10 रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे.

सुसंस्कृतपणाचा टेंबा मिरविणाऱ्या भाजपकडून अंगणालाच रणांगण म्हणणे अत्यंत चुकीचे -- कल्याण आखाडे

बीड दि.22  ( सिटीझन ) भारतीय संस्कृतीमध्ये अंगणाचे महत्त्व व पावित्र्य मोठे आहे. मात्र, सुसंस्कृतपणाचा टेंभा मिरविणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून अंगणालाच रणांगण म्हणणे अत्यंत चुकीचे व विरोधाभासी असल्याची प्रतिक्रिया सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली आहे.
         पुढे ते म्हणाले की, अंगण म्हटले की, सडा- सारवण, रांगोळी, तुळशीवृंदावन अशा प्रकारचे मनाला प्रसन्नता देणारं चित्र डोळ्यासमोर येते तर रणांगण म्हणलं की घनघोर लढाई, रक्तमांसाचा सडा असलं मनाला खिन्नता देणारं विचित्र चित्र डोळ्यासमोर ऊभं राहते.

बापरे, बीडजवळ सापडल्या तलवारी, धारदार सुरे आणि रामपूरी चाकू

बीड दि.22 ( सिटीझन ) बीड शहरापासून जवळच असलेल्या पालवण चौक परिसरातील  मस्के वस्ती या भागात छापा टाकून पोलिसांनी तलवारी धारधार सुरे, रामपुरी चाकू आणि छऱ्याची गण असा अवैध शस्त्र साठा जप्त केला आहे. 

बीड जिल्हयातील सर्व बँका उद्या चालू ठेवाव्यात-जिल्हाधिकारी रेखावार

बीड,दि.२२ ( सिटीझन )- जिल्हयातील सर्व बँका दिनांक २३ में २०२० रोजी संचारबंदीच्या शिथिल कालावधीत नागरिकांसाठी चालू ठेवाव्यात. सुट्टींच्या कारणामुळे बाधा येवू न देता या बँकांचे कामकाज चालू ठेवावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे. 

बीड: धक्कादायक आयसोलेशन वार्डात स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू ; आता रिपोर्टची प्रतिक्षा

बीड दि.22 ( सिटीझन ) येथील 
जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल झालेल्या एका व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. सदरील रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता स्वॅबचा रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्याला दिलासा , 35 पैकी 32 निगेटिव्ह तर 3 प्रलंबित

 बीड दि.21 ( सिटीझन ) बीड जिल्ह्याची आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातून काल पाठवलेल्या 35 जणांच्या स्वबपैकी रात्री उशिरा 32 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 3 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. काल पाठवलेल्या 35 स्वब पैकी 32 निगेटिव्ह आले ही बाब बीड जिल्ह्यासाठी दिलासा देणारी आहे.

आजचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कोरोनाचे वाढत जाणारे आकडे तूर्तास थांबले आहेत.

बीड जिल्ह्यात उद्यापासून लालपरी जिल्हांतर्गत धावणार

बीड दि.21 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यामध्ये उद्या दि.22 मे पासून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा 50 टक्के आसन क्षमतेनुसार म्हणजेच 22 प्रवाशी याप्रमाणे जिल्हांतर्गत सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक बीड कालिदास लांडगे यांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांनाही अधिकृत पत्र देण्यात आले आहे.

बीड जिल्ह्याला मोठा धक्का आणखी 13 पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 29 झाली

बीड दि.21 ( सिटीझन ) बीड जिल्ह्याची चिंता  आता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून काल पाठवलेल्या 114  जणांचे स्वबपैकी काल रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह आले होते तर 13 प्रलंबित होते आज दुपारी ते सर्वच्या सर्व 13 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. बुधवारी रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह अहवाल आले होते आणि आजचे 13 असे एकूण 29 पॉझिटिव्ह संख्या झाली आहे. 

कालचे प्रलंबित पॉझिटिव्ह आलेले रिपोर्ट खालील प्रमाणे 

आणखी 13 पॉजिटिव्ह
1  - सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील)
1 - कुंडी ता.धारूर
11 - नित्रूड ता.माजलगाव 

बीड जिल्हा रुग्णालयाची ओपीडी आजपासून आदित्य आयुर्वेदीक कॉलेजमध्ये

बीड (सिटीझन ):- जिल्हा  रुग्णालय बीड येथील सर्व बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आज दि. 21 मे पासून आदित्य आर्युवेदीक कॉलेज नाळवंडी  नाका बीड येथे स्थलांतरीत करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कळविले आहे. 

बीड जिल्हा रुग्णालयामध्ये  कोरोना बाधीत रुग्णांसाठी वार्ड तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 16 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या १६

**

बीड,(सिटीझन )- बीड जिल्ह्यात नवीन चार कोरोना विषाणू संसर्गाचे लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १६ झाली आहे . *जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्णसंख्या पुढील प्रमाणे

गेवराई-२
माजलगाव-३
बीड -५
केज-२
वडवणी -१
पाटोदा - ३

बीड जिल्ह्यात आणखी 4 पॉझिटिव्ह ; वडवणी आणि पाटोदा तालुक्यातील रुग्णाचा समावेश

 बीड दि.21 ( सिटीझन ) बीड जिल्ह्याची चिंता  आता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून 114  जणांचे स्वब पाठविण्यात आले होते. त्यापैकी बुधवारी रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या 16 झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण देखील रेड झोन मधून आलेले आहेत अशी माहिती आहे.

114 पैकी 4 पॉझिटिव्ह आहेत. अन्य 6 संशयीत आहे
निगेटिव्ह अहवाल - 90, प्रलंबित अहवाल - 19
रुग्ण कुठले आहेत वाचा 

वाहली ता. पाटोदा - 2 (वय 60 आणि 27 - दोन्ही महिला)
पाटोदा - 1 (वय 73 पुरुष), वडवणी  - 1 (वय 67 पुरुष)

अखेर सीएस डॉ.थोरात यांनी कोरोना वार्डाची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला

बीड दि. 20 ( सिटीझन ) जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात  शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी  बुधवारी रात्री उशिरा भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला. डॉ.थोरात स्वतः पीपीई किट घालून आत गेले आणि तेथील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. दरम्यान यासंदर्भात सायं दै. सिटीझन ने दि.19 मे रोजीचा अंकात वृत्त प्रकाशित करून तेथील सुविधांविषयीचा खरा प्रकार वाचकांसमोर आणला. एका कोरोना बाधित महिलेने सिटीझनशी साधलेला संवाद आणि त्या संवादातून जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची झालेली पोलखोल चर्चेचा विषय ठरली. त्या बाधित रुग्णाची आपबीती वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले असावे.

बीडमधील मोमीनपुरा, सावता माळी चौकातील ठराविक गल्ल्या पूर्णपणे लॉकडाऊन

 बीड दि.20 ( सिटीझन ) बीड शहरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यानंतर हे रुग्ण ज्या भागातील होते, त्या गल्ल्या कंन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या भागातील ठराविक गल्यांमध्ये आजपासून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

पंकजाताई म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहून चिंता वाटली!

बीड दि.20 ( सिटीझन ) भाजप नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून ट्विट करत बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहून चिंता वाटली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासोबतच अधिक काळजी घ्यावी असे आवाहन देखील पंकजाताईंनी केले आहे.

बीड जिल्ह्यात ईदच्या दिवशी दूध विक्रीसाठी परवाना आवश्यक

बीड दि.20 ( सिटीझन ) रमजान ईद निमित्त जिल्ह्यात सर्व ठिकाणी दुधाचा पुरवठा व दुधाची विक्री करण्यासाठी प्रशासनाकडून परवाना देण्यात येणार आहे. त्यासाठी दूध विक्री करणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तालुका कृषी कार्यालयाकडून परवाना प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी यांनी केले आहे.

Pages