बीड जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 30 झाली
बीड ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून 42 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी रात्री उशीरा 35 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये काल रात्री मयत झालेल्या तरुणाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. मात्र प्रलंबित असलेल्या 7 पैकी एक पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 30 झाले असून अन्य 6 रिपोर्ट प्रलंबित आहेत. आज पॉझिटिव्ह आलेला रुग्ण आष्टी तालुक्यातील धनगरवाडी येथील असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान जिल्हा रुग्णालयात मयत झालेल्या तरुणाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रात्री उशिरा त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात 37 कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्यापैकी 6 पुण्याला स्थलांतरीत झाले आहेत. 1 मयत तर 1 रुग्ण कोरोना मुक्त झालेला आहे. त्यामुळे कालपर्यंतचे 29 आणि आजचा 1
अशा एकूण 30 रूग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
Add new comment