Add new comment

बीडमध्ये तिघांची हत्या ; माय - लेकरांच्या समावेश

बीड दि.24 ( सिटीझन ) शहरातील शुक्रवार पेठ भागात आज भर दुपारी 3 जणांची हत्या झाल्याची घटना उघडकीस असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

बीड शहरातील पेठ बीड भागात आज दुपारी तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . संगीता संतोष कोकणे ( वय 31 ) , संदेश संतोष कोकणे ( अंदाजे वय 10 ) या दोन्ही माय लेकाचे मृतदेह एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले तर मयूर संतोष कोकणे ( वय 7 ) याचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे. पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरील खुनाचे कारण अद्याप समजू शकले नसून हा प्रकार कौटुंबिक वादातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून चौकशी नंतरच खरा प्रकार समोर येईल असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान मयत महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेल्याचे समजते. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.