बीड शहर

बीडमध्ये महिलेची निर्घृण हत्या ; पती ताब्यात

 

बीड दि.29 ( सिटीझन ) बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कत्तीने वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात व्यक्त केला जात आहे. 

बीड जिल्ह्यातील जैववैद्यकीय घनकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी 15 दिवसांची मुदत

बीड , दि.29 ( सिटीझन ) जिल्हयातील सर्व खाजगी तसेच शासकीय, निमशासकीय संस्था पॅथलॅब, आयुर्वेद, युनानी होमीयोपॅथीक, अॅलोपॅथी, दंत इत्यादी रुग्णसेवेतून आंतर व बाहयरुग्ण विभागातून निर्माण होणारा जैववैद्यकीय घनकच-याची विल्हेवाट जैव वैद्यकीय (व्यवस्थापन व हाताळणी) कचरा नियम, २०१६ प्रमाणे करणे आवश्यक असून बीड जिल्हयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेली संस्था कार्यरत आहे. सदर संस्था केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन जैव वैद्यकीय कच-याचे वैज्ञानिक पदधतीने जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावते. वरील

बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णावर पहिले डायलिसीस

बीड दि.29 ( सिटीझन ) येथील जिल्हा रुग्णालयात एका 32 वर्षीय  कोरोना बाधित तरुणावर आज डायलिसिस करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णावर झालेले हे पहिले डायलिसिस असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
दरम्यान कोरोना बाधित रुग्णावर इतर कोणतीही शस्त्रक्रिया करणे अवघड असते मात्र डॉ.अशोक थोरात आणि त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारले आणि डायलिसिस केले. 

पंकजाताईं म्हणाल्या , गोपीनाथ गडावर गर्दी नको ; घरातच दोन दिवे / समई लावा !

 

बीड दि.29 ( सिटीझन ) लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची 3 जून रोजी पुण्यतिथी आहे. मात्र गोपीनाथ गडावर कोणीही दर्शनासाठी किंवा मला भेटण्यासाठी गर्दी करू नये. घरातच साहेबांच्या फोटोसमोर दोन दिवे , समई लावा असे आवाहन माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी फेसबुकवरून संघर्ष दिन या हॅशटॅगखाली केले आहे. 

पंकजाताई म्हणाल्या,  गडाचा कार्यक्रम साधा व मोजक्या लोकांत असेल, तो Live दाखवता येईल. तुम्ही सर्वांनी कुटुंबा समवेत मुंडे साहेबांच्या फोटो समोर उजव्या बाजूला घरातील महिला आणि डाव्या बाजूला पुरुष उभे राहून दोन दिवे/ समई लावायचे आहेत...

धारूर शहर देखील पूर्ण बंद ; एक रुग्ण अनेकांच्या संपर्कात !

बीड दि.29 ( सिटीझन ) धारूर शहरात आढळलेला एक पॉझिटिव्ह रुग्ण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांच्या संपर्कात आल्याने आजपासून धारूर शहर पूर्ण बंद करून कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.

बीडकरांना थोडी सूट ; परवाना असणाऱ्या विक्रेत्यांना फिरून भाजीपाला , फळे विकता येणार

बीड दि.29 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी रात्री बीडकरांना दूध, भाजीपाला आणि फळे उपलब्ध होतील याबाबत आदेश दिले आहेत.दूध फिरून तर पूर्वीप्रमाणे परवाना असणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांना घरोघर फिरून विक्री करण्यास परवानगी दिली आहे. 

बीड जिल्ह्यात आज 5 पॉझिटिव्ह ; ' त्या ' पॉझिटिव्ह रुग्णाच्या गावातील 3 बाधित

बीड दि.28 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 5 व्यक्तींचे  रिपोर्ट पॉझिटिव्ह , 36 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णांमुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 46 + 5  अशी 51 झाली आहे. 

भाजपचे 'ते' नगरसेवक झाले पक्षापेक्षा मोठे! नेतृत्वाचा सल्ला न घेता केला अविश्वास ठराव दाखल

पक्षासाठी योगदान देणाऱ्या नगराध्यक्षांच्या पाटीत खुपसला खंजीर.
राज गायकवाड / माजलगाव 

माजलगावच्या विविध पक्षाच्या एकोणीस नगरसेवकांनी नगराध्यक्ष चाऊस यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी अविश्वास ठराव दाखल केला. यात भाजपाचे पाच नगरसेवक असून या अविश्वास ठरावा साठी यांनी नेतृत्वाची परवानगी न घेतल्याची माहिती समोर येत आहे. ज्या नगराध्यक्ष चाऊस यांनी पक्षाला अडचणीच्या काळात उभारण्याचे योगदान दिले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचे राजकीय विरोधक असणाऱ्या प्रकाश सोळंकेशी हातमिळवणी केल्याने भाजपचे नगरसेवक पक्षापेक्षा मोठे झाले असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

बीड जिल्हयातून आज 46 व्यक्तींचे स्वॅब पाठविले

 

बीड दि.27  ( सिटीझन ) कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वब आज सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख  शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय  व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर. बी. पवार यांनी दिली आहे. 
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

बीडमधील दोन मोठ्या हॉस्पिटलसह डायग्नोस्टिक सेंटरचा परिसर सील !

बीड दि.27 ( सिटीझन ) पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पेशंटने बीड शहरातील काही भागाच्या अडचणी वाढवल्या आहेत. सदरील पेशंट बीड शहरातील भाजी मंडई ते पत्रकार भवन रस्त्यावरील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यापूर्वी तोच पेशंट अन्य एका हॉस्पिटलमध्ये छातीत दुखू लागल्याने टू डी इको करण्यासाठी गेला होता मात्र तिथून तो तात्काळ गेल्याचे समजते.

बीड जिल्ह्यात आता आणखी 6 पॉझिटिव्ह ; दिवसभरात 8 पेशंट वाढले

बीड दि.26 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आज पाठवण्यात आलेल्या 30 जणांच्या स्वब पैकी 28 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये 6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कालच्या प्रलंबित 7 पैकी दुपारी 2 पॉझिटिव्ह आढळले होते आणि आता 6 असे आज दिवसभरात तब्बल 8 रुग्ण वाढले आहेत. आता जिल्ह्यात 47 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातून गेलेले 4 आणि परळी येथून गेलेले 2 असे एकूण 6 जणांच्या स्वबचे  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. इतर 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 2 प्रलंबित आहेत. 

■■ कोविड 19 - अहवाल दि.26 मे ■■

बीडमधील ' ते ' 2 पॉझिटिव्ह कुठले वाचा ; आज पुन्हा 30 व्यक्तींचे स्वॅब पाठविले

 बीड दि.26 ( सिटीझन )   जिल्ह्यातून काल 57 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील प्रलंबित असलेल्या 7 पैकी आज मंगळवारी 2 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले 2 रुग्ण बीड शहरातील दिलीप नगर भागातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते दोघेही मुंबईहुन आलेले आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान आज मंगळवारी पुन्हा 30 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर अहवाल अप्राप्त आहेत असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

बीड जिल्ह्यातील ' त्या ' वाळू माफियाविरुद्ध एमपीडीए ; हर्सूलमध्ये रवानगी

बीड दि.25 ( सिटीझन ) गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफियाला जिल्हा प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे.  तब्बल सहा गुन्हे दाखल असलेल्या विकास गोर्डे याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने त्यास स्थानबद्ध करून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात आज 50 रिपोर्ट निगेटिव्ह तर 7 प्रलंबित ; एकही पॉझिटिव्ह नाही

बीड दि.25 ( सिटीझन )   जिल्ह्यातून आज 57 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 57 पैकी एकही पॉझिटिव्ह आला नसून 50 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 7 प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान क्वारंटाईन असतांना मयत झालेल्या त्या व्यक्तीचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

बीड जिल्ह्यातील दुकाने दररोज सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत खुली राहणार

बीड दि.25 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी उद्या दिनांक 26 मे पासून मोठे बदल केले आहेत. यासंदर्भात आज काढलेल्या या आदेशांमध्ये सर्व आस्थापना दुकाने दररोज सकाळी 7.30  ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र सोशल डिस्टन्सचे नियम न पाळल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. सर्व केशकर्तनालय , ब्युटी पार्लर व तत्सम दुकानांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांनाही नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

बीडच्या बसस्थानकात 300 मजूर दाखल : आरोग्य विभागाच्या 9 टीमकडून तपासणी

बीड दि.25 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातील 300 मजूर ( मदूराई ) तामिळनाडू राज्यात अडकले होते.त्यांना घेऊन आलेल्या बसेस बीड येथील बसस्थानकात आज दुपारी दाखल झाल्या. यामधून तब्बल तीनशे मजूर बीडमध्ये दाखल झाले आहेत. आरोग्य विभागाच्या 9 शहरी टीमकडून  36 कर्मचारी त्यांची तपासणी करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रिकामे असलेल्या बस स्थानकात आज दुपारी मात्र मजुरांची गर्दी झाली होती. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तपासणीसाठी मजुरांचा रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Pages