बीड : आज पुन्हा 1 पॉझिटिव्ह तर 37 रिपोर्ट निगेटिव्ह
बीड दि.30 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून आज शनिवारी 38 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 37 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 1 पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आजच्या 1 रुग्णांमुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 50 + 1 अशी 51 झाली आहे.
बीड जिल्ह्यातून कॉविड -19 च्या निश्चित निदानासाठी 38 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब शनिवारी सकाळी लातूर येथे पाठविण्यात आले आहेत.बीड 33 आणि परळी रुग्णालयातून 5 असे 38 पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले आहेत. आज पाठविण्यात आलेले सॅम्पल पैकी 1 पॉझिटिव्ह तर 37 निगेटिव्ह आले आहेत.
■ आज 1 पॉझिटिव्ह अपडेट दि.30 मे ■
आज पाठविलेले स्वॅब नमुने संख्या-- 38
*पॉजिटिव्ह अहवाल--- 01 (मुंबईहुन आलेला आहे. वय 38 रा डोमरी ता पाटोदा)
निगेटिव्ह अहवाल --- 37
सदर माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Add new comment