बीड: टेन्शन कमी झालं पण धाकधूक कायम 64 पैकी 59 निगेटिव्ह तर 5 रिजेक्टेड

 

बीड दि.13 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज शनिवारी पाठवण्यात आलेल्या 99 व्यक्तींच्या स्वॅबपैकी प्रलंबित असलेल्या 64 स्वॅबचा रिपोर्ट आला असून 64 पैकी 59 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 5 रिपोर्ट रिजेक्टेड  असल्याची महिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान  64 पैकी 59 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने टेन्शन थोडं कमी झालं असलं तरी धाकधूक मात्र कायम आहे. कारण आता त्या 5 जणांचे स्वॅब पुन्हा पाठवावे लागणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींचा जीव टांगणीला होता. स्वॅब घेतले आता रिपोर्ट काय येतो ? याच चिंतेने अनेकांची झोप देखील उडाली होती. मात्र आज प्रलंबित असलेल्या 64 पैकी 59 निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. 

■ कोविड 19-बीड अपडेट - 13 जून ■ 

आज पाठविलेल्या 99 पैकी 35  अहवाल दुपारी मिळाले होते तर प्रलंबित राहिलेले सर्व 64 अहवाल प्राप्त झाले असून ते पुढील प्रमाणे आहेत 

◆ प्रलंबित राहिलेले स्वॅब - 64

◆ निगेटिव्ह अहवाल - 59

◆ रिजेक्टेड - 05

◆ पॉजिटिव्ह अहवाल - 00
अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.