नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न ; बैठक लांबली
आ.सोळंकेंचा अविश्वासाचा डाव पुन्हा लांबणीवर.
नगरसेवकांना फिरावं लागलं वापस.
राज गायकवाड-माजलगाव.
आ.प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पक्षाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.परंतु गत महिन्याभरापासून या ठरावाबाबत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असून हा अविश्वास ठरावाचा डाव लांबणीवर पडत आहे.शुक्रवार दि.12 रोजी जिल्हाधिकाऱ्यां समोर या ठरावा संदर्भात सुनावणी होणार होती परंतु स्वतः जिल्हाधिकारी कोरंटाइन झाल्याने सुनावणीसाठी गेलेल्या नगरसेवकांना परत पावली फिरावे लागले आहे.त्यामुळे नियतीला हा अविश्वास ठराव मान्य नसल्याचे संकेत मिळत असून 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' निर्माण होत असल्याच्या सूर यानिमित्त जनतेतून ऊमटत आहे.दरम्यान जिल्हा प्रशासनाने आता दि.16 रोजी बैठक बोलावली असून याबाबत पत्रही देण्यात आले आहे.
राजकीय विरोधक असणाऱ्या आ. सोळंके,जगताप यांनी विविध पक्षाच्या अठरा नगरसेवकांना एकत्र करत नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्याविरुद्ध 28 मे रोजी अविश्वास ठराव दाखल केला.यादरम्यान नगराध्यक्ष न्यायालयीन कोठडीत आहेत.त्यामुळे हा खिचडी गोंधळ करून आपला मांडव सजवणाऱ्या त्या सर्वांवर माध्यमातून टीकेची झोड उठली. या महिनाभरा दरम्यान चाऊस यांच्यावर अविश्वास दाखल करण्याच्या अनेक बैठका तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाल्या.त्यातच आज शुक्रवार 12 जून रोजी अविश्वास दाखल संदर्भात असणाऱ्या आरोपाची सुनावणी जिल्हाधिकारी बीड यांच्यासमोर होणार होती.परंतु दुर्दैवाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना ची लागण झाली असल्याची बातमी समोर आली,त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही स्वतः कोरंटाइन व्हावे लागले. त्यामुळे ज्यांच्या समोर नगरसेवकांची सुनावणी होणार होती तेच कोरंटाईन झाल्यामुळे नगरसेवकांना परत पावली करावे लागले. या घटनाक्रमामुळे आ. सोळंके,जगताप यांचा अविश्वास ठरावाचा डाव पुन्हा लांबणीवर गेला गेला असल्याचे दिसून येत आहे. नकटीच्या लग्नाच्या मुहूर्तासाठी धडपडणाऱ्या त्या सर्वांना नियतीचे हे संकेत मिळत असून नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न निर्माण होत असल्याचे नागरिकांमधून यानिमित्त ऐकायला मिळत आहे.
Add new comment