बीड : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; दुकाने सुरू मात्र हॉटेल्स, धार्मिक स्थळे बंदच
बीड दि.1 जून ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ' मिशन बिगीन अगेन ' अंतर्गत अनलॉक 5 संदर्भातील आदेश रविवारी रात्री काढले आहेत. यामध्ये दि.31 मे 2020 ते 30 जून 2020रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. दुकाने पूर्वी प्रमाणेच सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 यावेळेत सुरू राहणार असून धार्मिक स्थळे, हॉटेल्स बंदच राहणार आहेत. विवाहासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.
बीड जिल्ह्यात खालील गोष्टी बंद ( प्रतिबंधित ) असतील.
■ शाळा ,महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इ.
■ गृहमंत्रालय यांनी दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त इतर आंतराष्ट्रीय विमान प्रवास.
■ विशेष परवानगी व स्वतंत्र रित्या आदेश निर्गमित केल्या व्यतिरिक्त इतर सर्व अंतरराज्यीय हवाई सेवा व रेल्वे प्रवास.
■ सिनेमागृहे. व्यायाम शाळा, जलतरणिका, मनोरंजन पार्क थिएटर्स, प्रेक्षागृहे.सभागृहे आणि तत्सम सर्व जागा.
■ सर्व सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्य व इतर संमेलने व जमावास बंदी.
■ सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील.
■ शॉपिंग माल्स, हॉटेल, रेस्टॉरंट व, (केवल पार्सल/घरपोच सेवा चालू राहिल.
■ व्यक्ती तसेच मालवाहतूकी संदर्भात ठराविक प्रकरणात विशिष्ट निर्देश
■सर्व अंतरराज्यीय व राज्यांतर्गत प्रवासासाठी वैद्यकीय व्यवसायिक, नर्सेस व पॅरामेडिकल स्टॉफ इतर सर्व वैद्यकीय.
■ कर्मचारी व रुग्णवाहिका यांना कोणतेही बंधन असणार नाही. इतर सर्वाचा प्रवास आज ज्या पध्दतीने नियंत्रित आहे त्याच पद्धतीने नियंत्रित राहिल आणि वेळोवेळी आलेल्या आणि येणाऱ्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणेच राहील.
■ सर्व प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या मालवाहतूकीस तसेच रिकाम्या ट्रकच्या वाहतूकीस राज्यातंर्गत परवानगी दयावी. सर्व प्रकारची मालवाहतूक आज जशी चालू आहे तशीच चालू राहील.
■ शेजारील राष्ट्रांशी झालेल्या करारानुसार सीमेपलीकडे घेऊन जाण्याच्या मालवाहतूकीस कोणताही अडथळा असणार नाही.
■ ज्या गोष्टींना यापूर्वीच परवानगी देण्यात आलेली आहे त्या खालील अटीवर कायम राहतील.
■ परवानगी दिलेल्या कृतींना नव्याने शासनाकडून परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
■ क्रिडा संकुले, क्रिडांगणे व इतर सार्वजनिक खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु प्रेक्षक च सामूहिक क्रिडा/ व्यायाम कृतींना परवानगी राहणार नाही.
■ क्रिडा संकुलातील अंतरगृहात कृतींना (indoor) परवानगी राहणार नाही. सर्व शारीरीक व्यायाम व कृती या सामाजिक
■ दोन चाकी - 1 चालक
■ तीन चाकी; 1 चालक + 2
■ कार - 1 चालक + 2 परवानगी असेल.
■ जिल्हा अंतर्गत बससेवेला 50 टक्के प्रवाशी क्षमतेवर करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येते.
■ जिल्ह्याबाहेरील बस प्रवासास परवानगी देण्यात येणार नाही. त्याबाबत वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.
◆◆◆ आस्थापना/ दुकाने सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत दररोज चालू राहतील. सदर ठिकाणी सामाजिक अंतर न राखले गेल्यास सक्षम प्राधिकारी त्वरीत अशी दुकाने बंद करतील.
◆◆◆ Containment Zono गधील भागाचे
नियमन त्यांच्यासाठी केलेल्या विशेष आदेशातील तरतुदीप्रमाणे करण्यात येईल.
◆◆Contairittent Zone मध्ये जीवनावश्यक गोष्टींना परवानगी राहील।मध्ये काणताही व्यक्ती हालचाल करणार नाही यावर नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच जीवनाश्यक
वस्तूंचा पुरवठा करण्यास परवानगी राहील. या संदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नियमाचे अवलोकन करावे.
◆◆ आरोग्य सेतु ऑपचा वापर करावा
■ प्रत्येक कार्यालयाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्याकडे आरोग्य सेतु ऑपखाऊनलोड केले असले बाबत खात्री करावी. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने हे अॅप वापरावे.
■ असुरक्षित व्यक्तींची सुरक्षा
65 वर्षपेक्षा जास्त यांच्या व्यक्ती ज्यांना जुने आजार आहेत. गर्भवती महिला व 10 गवर्षाखालील मूले यांना जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर कधीही पडता येणार नाही.
■ रात्रीची संचारबंदी जीवनाश्यक सेवा व्यतिरिक्त वैयक्तीक हालचालींना संध्याकाळी 7 से सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू
■ संमेलने:- मोठया संख्येने लोक जमतील अशी संमेलनात यांना प्रतिबंध राहील.
■■■ विवाह विषयक:- 50 पेक्षा जास्त पाहुण्यांनी एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.
■■■■ अंत्यविधी:-20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.
■ सार्वजनिक ठीकाणी दारु पिणे, पान,तंबाखुचे सेवन करणे यास प्रतिबंध राहील, कामाच्या ठिकाणी अतिरिक्त निर्देश
याप्रमाणे नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत.
Add new comment