बीड शहरातील कर्फ्यु रद्द ; आजपासून सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत दुकाने खुली

बीड दि.30 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिनांक 30 मे रोजी पहाटे 2 वाजता नवीन आदेश काढून बीड शहरासह बारा गावातील पूर्ण कर्फ्यू रद्द केला आहे. कंटेनमेंट झोनमधील संचारबंदी कायम ठेवत शहरातील कर्फ्यू रद्द करण्यात आला असून आज दिनांक 30 मे पासुन शहरातील सर्व दुकाने पूर्वीप्रमाणे म्हणजेच सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत सुरु राहतील असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बीड शहरातील बालेपीर भागाचा काही परिसर कंटेनमेंट झोन घोषित केला आहे.
पाटोदा तालुक्यातील एका कोरुना पॉझिटिव्ह रुग्णाचा संपर्क बीड शहरातील दोन मोठे हॉस्पिटलसह इतर लोकांशी आल्याने दिनांक 27 मे रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरासह 12 गावामध्ये दिनांक 4 जून पर्यंत 100% कर्फ्यु लागू केला होता मात्र शुक्रवारी शहरातील दोन मोठ्या हॉस्पिटलमधील संबंधित व्यक्ती आणि संपर्कातील अन्य व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक 30 मे रोजी पहाटे आदेश काढून पूर्णवेळ संचार बंदीचे आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे आज दिनांक 30 मे पासून शहरातील बाजारपेठ दिनांक 25 मेच्या आदेशानुसार म्हणजेच सकाळी 7. 30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. इतर बारा गावातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे तेथील व्यवहारही पूर्वीप्रमाणे सुरू होतील.
■ बीड तालूक्यातील खंडाळा, चराटा, पालवण व इट, पाटोदा तालूक्यातील वैजाळा
व डोंगरकिन्ही, वडवणी तालूक्यातील देवडी, गेवराई वालूक्यातील खांडवी,मादळमोही व धारवंटा , केज तालूक्यातील खरमाटा व धारुर तालूक्यातील पारगांव येथील प्रतिवंधात्मक आदेश शिधील करण्याल आले आहेत.
■ बीडमधील मोमीनपुरा -अशोकनगर, जयभवानी नगर,सावतामाळी चौक, संभाजीनगर, बालेपीर येथील परिसरात प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.
■ दिनांक 28 मे रोजीचे किराणा सेवा घरपोच , बैंका बाबत व अत्यावश्यक सेवेवाबत
काढलेले फिरते दुध दिक्रेते, जार वाटर सप्लायर्स इ. बाबतचे तीनही आदेश रद्द करण्यात येत आहेत.
■ यापूर्वी या कार्यालयाने दिनांक 25 मे रोजी कादलेले आदेश पूर्ववत करण्यात येत आहेत. ज्याद्वारे जिल्हयातील सार्व भागांना (Coretiramert व Buter zone वगळून) तकाली 7.30 ते संध्याकाळी 6.30 पर्यत
परयानगी देण्यात आलेली होती.
■ बीड : धारूर तालुक्यातील एक पॉझिटिव्ह बालेपीर येथील 4 जणांच्या संपर्कात आला आहे. त्याचबरोबर या भागात एक पॉझिटिव्ह आढळल्याने डॉ. सुहास देशपांडे यांच्या घरापासून ते युसूफ भाई ड्रायव्हर यांच्या घरापर्यंत केंटेन्मेंट झोन घोषित करन्यात आला आहे.
Add new comment