बीड दि.22 ( सिटीझन ) भारतीय संस्कृतीमध्ये अंगणाचे महत्त्व व पावित्र्य मोठे आहे. मात्र, सुसंस्कृतपणाचा टेंभा मिरविणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून अंगणालाच रणांगण म्हणणे अत्यंत चुकीचे व विरोधाभासी असल्याची प्रतिक्रिया सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले की, अंगण म्हटले की, सडा- सारवण, रांगोळी, तुळशीवृंदावन अशा प्रकारचे मनाला प्रसन्नता देणारं चित्र डोळ्यासमोर येते तर रणांगण म्हणलं की घनघोर लढाई, रक्तमांसाचा सडा असलं मनाला खिन्नता देणारं विचित्र चित्र डोळ्यासमोर ऊभं राहते.