बीड जिल्ह्याचे टेन्शन वाढले ; 6 रिपोर्ट पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 39 झाली
बीड दि.24 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज
40 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 40 पैकी 6 पॉझिटिव्ह तर 33 निगेटिव्ह रिपोर्ट आले असून 1 प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले. आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या 39 झाली आहे. दरम्यान यामध्ये ' त्या ' रूग्णाशी संपर्क आलेल्या ग्रामीण पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले ही बाब दिलासा देणारी आहे मात्र 6 पॉझिटिव्ह आल्याने टेंशन वाढले आहे.
बीड शहरातील एका कोरोना बाधित रुग्णाचा अनेकांशी संपर्क आल्याने या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बीड जिल्ह्यातील आज पाठविण्यात आलेल्या 40 पैकी 6 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या 39 झाली आहे.
*कोविड 19अपडेट /24 मे 2020*
एकूण स्वॅब ~ 40
पोजिटिव्ह ~ 6
निगेटिव्ह - 33
प्रलंबित 1
-----
3 - साखरे बोरगाव ता बीड (पुरुष वय 48, महिला 35, मुलगी 13) (मुंबईहुन आलेले)
-------
१ - पाटोदा शहर (पुरुष वय 40) (मुंबईहुन आलेले)
-------
2 - वडवणी (पुरुष वय 36 आणि महिला 30 ) (मुंबईहुन आलेले)
सदरील माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Add new comment